सोनालिकाने नोव्हेंबर २०२१ मध्ये बाजरपेठेतील १.४ टक्के वाढीसह ११,९०९ ट्रॅक्टर्स विक्रीचा रेकॉर्ड नोंदवला

Share this Newz

The Newz Biz Team, PUNE : 

कृषीक्षेत्रातील तंत्रज्ञानाच्या महत्त्वाबद्दलची जागरूकता वाढत असल्यामुळे कृषी उपकरणांमध्ये जलदगतीने नवोन्मेष येत आहे. जगभरातील शेतकरी प्रगतीशील होत आहेत आणि म्हणूनच पारंपरिक सणासुदीच्या काळाच वाढणाऱ्या मागणीच्या तुलनेत शेतीच्या यांत्रिकीकरणासाठी आवश्यक उपकरणांची मागणी अधिक वाढत आहे. सोनालिका ट्रॅक्टर्स या भारतातील आघाडीच्या ट्रॅक्टर उत्पादक कंपनीने तसेच पहिल्या क्रमांकाच्या निर्यात ब्रॅण्डने, उद्योगक्षेत्राच्या दोन पावले पुढे जाणारी, उत्तम कामगिरी कायम राखली आहे. कंपनीने १.४ टक्के वाढीसह नोव्हेंबरमध्ये बाजारपेठेतील १६ टक्के एवढा आत्तापर्यंतचा सर्वोच्च वाटा प्राप्त केला. एकंदर कंपनीने नोव्हेंबर’२१ या महिन्यात एकूण ११,९०९ ट्रॅक्टर्सची विक्री केली.

या महिन्यात सोनालिकाने आपली निर्यातीतील आघाडीही वाढवली आणि पहिल्या क्रमांकाचा निर्यात ब्रॅण्ड हे आपले स्थान अधिक भक्कम केले. कंपनीने कॅलेंडर वर्षाच्या आजच्या तारखेपर्यंत (वायटीडी) २२,२६८ ट्रॅक्टर्स निर्यात केले आहेत आणि संपूर्ण आर्थिक वर्ष २१मधील विक्रीचा आकडा केवळ ८ महिन्यांच्या काळात पार केला आहे. मागील वर्षाच्या याच कालखंडात झालेली १२,९३७ ट्रॅक्टर्सची विक्री झाली हे बघता, तब्बल ७२.२ टक्के वायटीडी वाढ कंपनीने साध्य केली आहे. एकंदर सोनालिकाने नोव्हेंबर महिन्यात ३,२२५ ट्रॅक्टर्सची विक्री केली. गेल्या वर्षी याच महिन्यात हा आकडा १६०७ एवढा होता. याचा अर्थ नोव्हेंबर महिन्यातील विक्रीमध्ये १००.७ टक्के वाढ झाली.

सोनालिका ट्रॅक्टर्सचे कार्यकारी संचालक श्री. रमण मित्तल म्हणाले की जागतिक मानक दर्जामुळे योग्य वेळी सर्वांपुढे येणारी नवीन मॉडेल्स, उत्पादनांचे आदर्श पद्धतीने मिश्रण, वाढीच्या योजनांनुसार बदलता येतील अशा कारखान्यांच्या क्षमता आणि ऑर्डर्स यांबाबत राखली जाणारी वचनबद्धता हे सोनालिकाने प्राप्त केलेल्या यशातील महत्त्वाचे मुद्दे आहेत.

शेतकऱ्यांच्या प्रदेशविशिष्ट गरजांनुसार कस्टमाइझ्ड ट्रॅक्टर्सची बांधणी करणे हे आमचे सर्वांत मोठे बलस्थान आहे आणि त्याचमुळे आम्हाला शेतकऱ्यांच्या साथीने प्रगतीशील कृषी उपक्रम राबवण्याची संधी मिळते. या सर्व घटकांनी एकत्रितपणे आम्हाला १.४ टक्के वाढीसह नोव्हेंबरमध्ये बाजारपेठेतील १६ टक्के एवढा सर्वोच्च वाटा गाठून दिला हे जाहीर करताना मला आनंद होत आहे.


Share this Newz