डोनेट एड सोसायटीच्या वतीने संजीवन समाधी सोहळा, तसेच काकड आरती सांगता समारोप 

Share this Newz

द न्यूज बिज् टीम, पिंपरी : 

डोनेट एड सोसायटीच्या वतीने आमदार लक्ष्मण जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली संजीवन समाधी सोहळा तसेच काकड आरती सांगता समारोप आणि कार्तिक स्नान यांचे औचित्य साधून ज्ञानोबारायांच्या हृदयस्पर्शी भावस्पर्शी अभंगाचा कार्यक्रम नुकताच पार पडला.

सांगवीतील गजानन महाराज मंदिरासमोर या भजन संध्येचे आयोजन करण्यात आले होते. या भजन संध्येसाठी झी मराठी फेम सोमनाथ साठे, निलेश कसबे, वैभव महाराज यांनी गायन केले, तसेच सूत्रसंचालक प्रभाकर कराळे यांनी या कार्यक्रमाचे सादरीकरण केले. या कार्यक्रमाचे दीप प्रज्वलन महापौर माई ढोरे, नगरसेवक संतोष कांबळे, शिवाजीराव ढोरे ,बाळासाहेब शितोळे, सारिका कृष्णा भंडलकर ,कृष्णा भंडलकर यांच्या उपस्थितीत करण्यात आले.
ज्ञानेश्वर माऊलींचा जीवनपट उलगडणारी विविध अभंग आणि भावगीते या माध्यमातून हा संजीवन सोहळा वारकरी संप्रदायाच्या सर्व उपस्थित श्रोतृवर्गाने अनुभवला. या सोहळ्यासाठी ग्रामस्थ भजनी मंडळ सांगवी यांचे सहकार्य लाभले. शिवाजीराव ढोरे, बाळासाहेब शितोळे, अशोकराव ढोरे आदी मान्यवरांचे सहकार्य लाभले. या कार्यक्रमासाठी हिरेन सोनवणे, नगरसेवक संतोष कांबळे, जवाहर ढोरे, सिनेट सदस्य संतोष ढोरे, सामाजिक कार्यकर्ते आप्पा ठाकर, उमेश बोरसे, ललित म्हसेकर, वाघ महाराज, ज्येष्ठ नागरिक संघाचे बंडोपंत शेळके, कमलाकर जाधव, दत्तात्रय येनपुरे आदी उपस्थित होते.

Share this Newz