स्वच्छ सर्वेक्षण अभियान : दिघी ते गेट वे ऑफ इंडीया मुंबई पर्यावरण पूरक सायकल रॅली 

Share this Newz

द न्यूज बिज् टीम, पुणे : 

पर्यावरण पूरक स्वच्छता संदेश देत सायकल रॅलीच्या माध्यमातून पुणे-मुंबई महामार्गावरील नाम फलक व दिशादर्शक फलकांची स्वच्छता, तसेच झाडे लावा, झाडे जगवा, पाणी आडवा, पाणी जिरवा, सायकल चालवा, इंधन वाचवा, आपली मुलगी सुरक्षित मुलगी आदी पर्यावरण निसर्गसंवर्धन जनजागृती व शरीरयष्टीसाठी सायकल किती महत्त्वाची आहे, या बाबत सायकल रॅलीतून जनजागृती करण्यात येणार आहे.

या निमित्ताने दिघीतील सायकलपटूना शुभेच्छा देण्यासाठी पिंपरी चिंचवड शहराच्या महापौर माई ढोरे यांच्या हस्ते टी शर्टचे अनावरण करण्यात आले, तसेच या रॅलीतील सायकलपटूनां शुभेच्छा देण्यासाठी उपमहापौर हिरा (नानी) घुले, माजी महापौर नितीन काळजे, नगसेविका निर्मला गायकवाड, माजी सैनिक अध्यक्ष अशोक काशिद, सायकलपटू सचिन लांडगे, संजय गायकवाड, उदय गायकवाड, अविरत संस्थेचे राजेंद्र माळी, दिघी विकास मंचचे के.के. जगताप, सुनिल काकडे, नाभिक संघटनेचे संदिप पंडित, युवा सेनेचे भाग्यदेव घुले आदी उपस्थित होते.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नामदेव रढे यांनी, तर आभार सायकलपटू दत्ता घुले यांनी मानले .


Share this Newz