शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांचे निधन

Share this Newz

 द न्यूज बिज् टीम, पुणे 

शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांचे वयाच्या ९९ व्या वर्षी निधन झाले आहे. त्यांनी पहाटे ५ वाजून ७ मिनिटांनी पुण्याच्या दिनानाथ मंगेशकर रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला.

सकाळी १०.३० वाजता त्यांच्या पार्थिवावर पुण्यातील वैकुंठ स्मशानभूमीत अंत्यसंस्कार होणार आहेत. त्यांचे पार्थिव पर्वती इथल्या पुरंदरे वाड्यात अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आले आहे. त्यांच्या अंत्यदर्शनासाठी लोकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली आहे.

 


Share this Newz