अ‍ॅक्सिस म्युच्युअल फंडाचा बॅलन्स्ड अ‍ॅडव्हान्टेज फंड विभागात प्रवेश

Share this Newz

द न्यूज बिज् टीम, पुणे : 

भारतातील आघाडीच्या म्युच्युअल फंड हाऊसपैकी एक असणाऱ्या अ‍ॅक्सिस म्युच्युअल फंडाने आपला सध्या अस्तित्वात असणारा अ‍ॅक्सिस डायनॅमिक इक्विटी फंड या फंडाचे नाव आणि पोझिशन दोन्ही बदलले असून ते आता अ‍ॅक्सिस  बॅलन्स्ड अ‍ॅडव्हान्टेज फंड केले आहे. अ‍ॅक्सिस बॅलन्स्ड  अ‍ॅडव्हान्टेज फंड हा ओपन एन्डेड शक्तिशाली मालमत्ता विभाजन फंड असून तो इक्विटी आणि निश्चित उत्पन्न यामध्ये कृतीशीलपणे कार्यरत आहे.

अंतर्गत प्रवर्तक पद्धतीने मालमत्ता वाटप होत असून बाजारपेठीय परिस्थितीला अधोरेखित करून बदलाला प्रतिसाद देताना इक्विटी एक्स्पोजर व्यवस्थापनाची अनुमती ते आपल्याला देतात. फंडाचे हे प्रभावी स्वरूप सगळ्या गुंतवणूकदारांसाठी आदर्श गुंतवणूक पर्याय ठरणार आहे कारण फंड केवळ बाजारातील चढ उतार असलेली परिस्थितीच अधिक चांगल्या प्रकारे सांभाळतो असे नाही तर दीर्घकाळासाठी संपत्ती निर्माणावरही लक्ष केंद्रित करत आहे. 

नजीकच्या काळात इक्विटीच्या मूळच्या अस्थिर रुपामुळे काही काही वेळेला किंमतीमध्ये अनैसर्गिकता येऊ शकते. यामुळे गुंतवणूकदारांच्या क्रियांवर परिणाम होऊन बाजार तेजीवर असताना खरेदी आणि पडलेला असताना विक्री अशा उलट क्रिया घडून संपत्ती ऱ्हास होऊ शकतो. जर गुंतवणूकदारांना सुयोग्य जोखीम व्यवस्थापन करणारे उत्पादन सादर केले, तर मात्र हा ऱ्हास थोपवता येऊ शकतो.

या मूलभूत समस्येचे उत्तर गुंतवणूकदारांसाठी शोधणे हे  अ‍ॅक्सिस बॅलन्स्ड अ‍ॅडव्हान्टेज फंडचे ध्येय आहे. त्यांच्या प्रवर्तकीय पद्धतीद्वारे इक्विटी आणि निश्चित उत्पन्न एक्स्पोजरमध्ये योग्य व्यवस्थापन करून गुंतवणुकीची मूलभूत तत्वे साध्य करण्याचा प्रयत्न करणे हे त्यांचे उद्दिष्ट आहे.

सुधारित आवृत्तीनंतर, अ‍ॅक्सिस बॅलन्स्ड अ‍ॅडव्हान्टेज फंडाकडे इक्विटी आणि निश्चित उत्पन्न या दोन्हीमध्ये कमीत कमी ० टक्क्यांपासून जास्तीत जास्त १०० टक्क्यांपर्यंत विशिष्ट मालमत्ता वर्गात गुंतवणूक करण्याची अधिक लवचिकता येईल. आरईआयटीज आणि इनआयटीज च्या युनिट्स मध्ये ० टक्क्यां वरून १० टक्क्यांपर्यंत गुंतवणूक करण्याचीही योजनेची तरतूद आहे. 

अंतर्गत पद्धतीमुळे मालमत्ता वर्गांमध्ये वाटपासाठी फंड व्यवस्थापकाला मार्गदर्शन मिळत असताना शेअर्सची निवड ही संपूर्णपणे फंड व्यवस्थापकाच्या दृष्टिकोनावर आधारित प्रक्रिया आहे. अ‍ॅक्सिस बॅलन्स्ड अ‍ॅडव्हान्टेज फंडामध्ये निवडलेल्या शेअर्सला गुणवत्तेत तडजोड नाही या अ‍ॅक्सिस म्युच्युअल फंडाच्या तत्वज्ञानाचे पाठबळ आहे. सध्याच्या काळाचा विचार करून ठरवलेल्या मापदंडापेक्षा वेगाने वाढ होणारे शेअर्समध्ये गुंतवणूक करणे अपेक्षित आहे.पहिल्यांदाच गुंतवणूक करणारे किंवा नेहमीचे गुंतवणूकदार असले तरीही अ‍ॅक्सिस बॅलन्स्ड अ‍ॅडव्हान्टेज  फंड गुंतवणूकदार मूलभूत वाटपाचा एक भाग बनू शकतो. इक्विटी आणि फिक्स्ड उत्पन्न यांच्यामधील मालमत्ता वाटणी व्यवस्थापनाची फंडाची क्षमता दीर्घकाळ गुंतवणुकीसाठी पात्र ठरवते.

अ‍ॅक्सिस एएमसीचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रेश निगम म्हणाले, की गुंतवणूकदार म्हणून आपल्या सर्वांनाच या आत्मविश्वासाने गुंतवणूक करायची इच्छा असते की आपली गुंतवणूक शेअर बाजाराच्या चढ उतारावरअस्थिरतेवर कोसळू नये. बॅलन्स्ड अ‍ॅडव्हान्टेज फंड इक्विटी एक्स्पोजरला व्यवस्थित हाताळणाऱ्या रचनाबद्ध प्रक्रियेच्या माध्यमातून गुंतवणूकदारांची इक्विटी जोखीम कमी करतो.


Share this Newz