वन्य पशूपक्षी व प्राण्यांवर औषधोपचासाठी शंकर जगताप यांच्या हस्ते रेस्क्यू व्हॅनचे लोकार्पण

Share this Newz

द न्यूज बिज् टीम, पुणे

वन्यजीव सप्ताहाचे औचित्य साधून जखमी अवस्थेत सापडणाऱ्या वन्य पशू पक्षी व प्राण्यांवर वेळेवर औषधोपचार मिळावा, या करीता सांगवीमध्ये रेस्क्यू व्हॅन तयार करण्यात आली आहे. या व्हॅनमध्ये रेस्क्यू साहित्यासोबत डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली प्रथमोपचार करण्यासाठी फस्टेड किट देखील ठेवण्यात आले आहे.

या व्हॅनचे लोकार्पण माजी नगरसेवक शंकर जगताप यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी शंकर जगताप यांनी वन्य पशू पक्षी संरक्षण सामाजिक संस्थेच्या कार्याची स्तुती करत वन्यजीव वाचवणे, ही काळाची गरज आहे. झाडा सोबत हे वन्य प्राणी देखील वाचने खूप महत्त्वाचे आहे आणि ह्या प्राण्यांना वेळेवर योग्य तो औषधोपचार मिळणे देखील तितकेच आहे. संस्थेच्या कार्यास लागणारी योग्य मदत करण्याचे देखील त्यानी आश्वासन दिले.

यावेळी संस्थेचे अध्यक्ष सुरेखा बडदे, सचिव विनायक बडदे, कार्याध्यक्ष प्रमोद कांबळे, प्रविण पवार, अनिकेत निर्मळ, प्रसाद चाकणकर, अभिजीत वडपल्ली, रामेश्वर अंभोरे, अजय कसाब, गोपाल शिंदे,  रोहन कचरे, नूतन मथुरे, पालवी बडदे, अंचल मोहिते, अक्षय जाधव, व्यंकटेश बडदे उपस्थित होते.


Share this Newz