द न्यूज बिज् टीम, पिंपरी :
आमदार लक्ष्मण जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली आणि माजी नगरसेवक शंकर जगताप यांच्या प्रयत्नातून प्रतिभा महिला प्रतिष्ठान अंतर्गत रमाई महिला प्रतिष्ठान तर्फे आयोजित करण्यात आलेल्या गौरी गणपती सजावट स्पर्धा, बक्षीस वितरण समारंभ, खेळ पैठणीचा आणि सामाजिक गुणगौरव समारंभ 2021 (वर्षे ४ थे) नुकताच रामकृष्ण मंगल कार्यालय पिंपळे गुरव येथे संपन्न झाला. कार्यक्रमास पिंपळे गुरव प्रभाग 29 मधील नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

या कार्यक्रमात गौरी गणपती बक्षीस वितरण, आदर्श माता पिता गौरव, विविध सामाजिक संस्था, गृहरचना संस्था, गणपती मंडळ, महिला मंडळ, महिला बचत गट, खेळाडू, आरोग्य कर्मचारी, आरोग्य केंद्र, कोविड योद्धे, विशेष गुणगौरव पुरस्कारांचे वितरण करण्यात आले.

यावेळी पिंपरी चिंचवड महापालिकेच्या महापौर उषा (माई) ढोरे, अश्विनी जगताप (अध्यक्ष प्रतिभा महिला प्रतिष्ठान) माजी नगरसेवक शंकर जगताप, नगरसेवक शशिकांत कदम, नगरसेविका उषा मुंढे, नगरसेवक हर्षल ढोरे, नगरसेवक संतोष कांबळे, नगरसेविका शारदा सोनावणे, नगरसेविका सीमा चौगुले, स्विकृत नगरसेवक महेश जगताप, माजी नगरसेविका वैशाली जवळकर (सांगवी- काळेवाडी भाजपा महिला मंडल अध्यक्ष), सामाजिक कार्यकर्ते राहुल जवळकर, रविना आंगोळकर, सुषमा कदम, पल्लवी जगताप यांच्या उपस्थितीत संपन्न झाला.

कार्यक्रमाचे आयोजक सागर आंगोळकर (नगरसेवक, अध्यक्ष ड प्रभाग) यांनी उपस्थित मान्यवरांचे, पदाधिकाऱ्यांचे तसेच नागरिकांचे आभार मानले.












Leave a Review