द न्यूज बिज् टीम, पिंपरी :
नवी सांगवी येथील प्रसिद्ध दंत चिकित्सक(डेंटिस्ट) आदित्य डेंटल अॅड अॅडव्हान्स इनप्लांट सेंटरचे संचालक डॉ. आदित्य पतकराव यांची सर्वाधिक कर देणारे दंत चिकित्सक म्हणून वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड, लंडन येथे नोंद झाल्याबद्दल श्री समर्थ प्रतिष्ठानचे अध्यक्ष ललित म्हसेकर यांच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी सचिन पालांडे, डॉ. स्वप्नील देशमुख, उद्योजक संदीप देसाई, किशोर जावळेकर, उद्योजक किशोर जवळकर, बाळासाहेब खरात, सुरेश गायकवाड, डॉ. सौरभ सर आदी उपस्थित होते.
ललित म्हसेकर म्हणाले, की यापूर्वी केवळ पिंपरी चिंचवडचे पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांची लंडन येथील वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये नोंद झाली होती. त्यानंतर डॉक्टर आदित्य यांची निवड झाली आहे. त्यामुळे पिंपरी चिंचवड शहरामधून वेगवेगळ्या क्षेत्रातील या दोन मान्यवरांची वर्ल्ड रेकॉर्ड लंडन येथे नोंद झाल्यामुळे आंतरराष्ट्रीय पातळीवर शहराचा नावलौकिक झाला आहे. यापूर्वी डॉक्टर आदित्य यांना लंडन पार्लमेंटचा अत्यंत सन्मानाचा समजला जाणारा “जागतिक एक्स्लन्स पुरस्कार २०१९” हा पुरस्कार मेंबर अॉफ ब्रिटिश पार्लमेंट यांच्या हस्ते लंडन पार्लमेंट हाऊस प्रदान करण्यात आला होता. तसेच राज्य मराठी पत्रकार संघाच्या वतीने देखील वैद्यकीय क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल त्यांचा सन्मान करण्यात आला होता.







Leave a Review