द न्यूज बिज् टीम, पिंपरी :
राज्यातील 15 महापालिकेच्या निवडणुका येत्या फेब्रुवारीमध्ये होण्याची शक्यता आहे. या निवडणुकीसाठी मुंबई महापालिका वगळता इतर महापालिकांमध्ये 3 नगरसेवकांचा प्रभाग करण्यावर आज (बुधवार) झालेल्या मंत्री मंडळाच्या बैठकीत शिक्कामोर्तब झाले आहे.
2017 मध्ये झालेल्या महापालिका निवडणुकीत तत्कालीन देवेंद्र फडणवीस सरकारने 4 सदस्य पद्धतीने निवडणुक घेतली होती. आगामी महापालिका निवडणुकीसाठी आता 3 नगरसेवकांचा एक प्रभाग असणार आहे.
दरम्यान, राज्यातील महाविकास आघाडीतील प्रत्येक पक्षाचा एक सदस्य याप्रमाणे 3 उमेदवार असण्याची शक्यता आहे.








Leave a Review