एस.एस.पी. संस्थेच्या सिध्दी कॉलेज ऑफ फार्मसी पदवीकाचा निकाल ९८.३६ टक्के

Share this Newz

द न्यूज बिज् टीम, पिंपरी : 

दापोडी येथील एस.एस.पी. शिक्षण संस्थेच्या नेवाळे वस्ती चिखली येथील सिध्दी कॉलेज ऑफ फार्मसी पदवीकाचा या वर्षीचा निकाल प्रथम वर्ष ९८.३६ टक्के व द्वितीय वर्षात ९८.३० टक्के इतका लागला असून कॉलेजची विद्यार्थिनी दिव्या गजानन चांदोरकर हिने ९०.१८ टक्के गुण मिळवून प्रथम क्रमांक पटकाविला आहे.

महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळ, मुंबई यांच्या औषधनिर्माण शास्त्र पदविका परिक्षेच्या प्रथम आणि व्दितीय वर्षाचा निकाल नुकताच जाहीर करण्यात आला. यामध्ये सिद्धी कॉलेज ऑफ फार्मसीच्या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश मिळविले. केदार पंढरीनाथ रामकिशनने ८६.९१ टक्के गुण मिळवून द्वितीय क्रमांक, तर संतोषी भिकाराम चौधरी हिने ८६ टक्के गुण मिळवून तृतीय क्रमांक पटकाविला. तर द्वितीय वर्षाच्या परीक्षेत रेखा शेराराम चौधरी ८८ टक्के (प्रथम), सय्यद शाहरुख सय्यद हिने ८४.१० (द्वितीय) व सायली गुरुदास कदम हिने ८३.१० टक्के गुण मिळवत तृतीय क्रमांक पटकावला.

सर्व गुणवंत विद्यार्थांचे संस्थेचे अध्यक्ष एस. बी. पाटील, तसेच प्राचार्य डॉ. प्रवीणकुमार साबळे यांनी अभिनंदन केले.


Share this Newz