दापोडीतील संजय नाना काटे युवा मंच व कै. शांताराम बाईत प्रतिष्ठान तर्फे आयोजित घरगुती गणपती सजावट स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद 

Share this Newz

द न्यूज बिज् टीम, पिंपरी : 

महिलांच्या कलागुणांना वाव मिळावा, या दृष्टीने दापोडीतील संजय नाना काटे युवा मंच व कै. शांताराम बाईत प्रतिष्ठान यांच्या वतीने घरगुती गणपती सजावट स्पर्धा  2021 चे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या स्पर्धेमध्ये 120 स्पर्धकांनी सहभाग घेतला होता.

या स्पर्धेमध्ये दापोडी, फुगेवाडी, कासारवाडी विभागातील महिलांनी सहभाग घेतला होता. या स्पर्धेतील विजेत्या महिलांना संजय नाना काटे (मा.नगरसेवक पिंपरी चिंचवड महापालिका), अमित काटे व माधवी बाईत यांच्या हस्ते शाल, श्रीफळ व स्मृतीचिन्ह देऊन गौरविण्यात आले.
या स्पर्धेत प्रथम क्रमांक अश्विनी मते यांनी पटकावला. द्वितीय क्रमांक सारिका जाधव यांनी,  तृतीय क्रमांक सीमा मिर्झापुरे यांनी, चतुर्थ क्रमांक अलका दाभोळकर यांनी, तर पाचवा क्रमांक सुनिता बोत्रे यांनी मिळवला. उत्तेजनार्थ सविता काळभोर, राणी कांबळे, सुवर्णा काळभोर, नंदा पाटील, शारदा पवार यांना देऊन सन्मानित करण्यात आले.
यावेळी बोलताना संजय नाना काटे यांनी सांगितले, की आज प्रत्येक महिलाही स्वतः घरामध्ये सजावट करून गणेशोत्सव स्पर्धेमध्ये भाग घेत आहे, ही स्वागतार्ह गोष्ट आहे. आज कोरोनाचे सावट कमी झालेले नसतानाही महिलांचा सहभाग हा उल्लेखनीय आहे.
यावेळी जयसिंग काटे, निखिल मते, विलासआण्णा काटे, दाविद बळीद, हंसराज काटे, कालिचरण पाटोळे, सतगुरु काटे आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रविंद्र बाईत यांनी, तर आभार अनिल मोरे यांनी मानले.

Share this Newz