The Newz Biz Team, PIMPRI
संतनगर मोशी प्राधिकरण येथील संघर्ष संस्था प्रतिष्ठानच्या गणपती उत्सवात सर्वधर्म समभावाचे दर्शन घडून आले. असे आगळेवेगळे विविध उपक्रम राबविणाऱ्या या मंडळाचे सर्वत्र कौतुक होत आहे.
गणपती उत्सवा निमित्त गणपतीची पूजा व आरती मोशीतील जेष्ठ मुस्लीम मार्गदर्शक फकीर मोहम्मद शेख यांच्या हस्ते करण्यात आली. हा वेगळा पायंडा यानिमित्ताने पाडून मंडळाने समाजापुढे सर्वधर्म समभावाचे दर्शन घडविले आहे.

या प्रतिष्ठानचे हे 21 वे वर्ष आहे . आजवर विविध उपक्रमाच्या माध्यमातून अनेक विधायक कार्य करणाऱ्या युवा कार्यकर्त्यांचा सत्कार नगरसेवक संजय आहेर, उद्योजक लक्ष्मण पांचाळ यांच्या हस्ते करण्यात आला.

यावेळी संस्थेचे संस्थापक पंकज पवार, शिवाजीराव पवार, उद्योजक इंगळे, तसेच मंडळाचे कार्यकर्ते उपस्थित होते.







Leave a Review