ग्लेनमार्क फार्मास्युटिकल्सने फेव्हिपीरावीरवर पीएमएस संशोधन

Share this Newz

The Newz Biz Team, PUNE

ग्लेनमार्क फार्मास्‍युटिकल कंपनीने आज भारतामध्‍ये फेव्हिपीरावीर (फॅबिफ्लू®) वरील त्‍यांचे पोस्‍ट मार्केटिंग सर्व्‍हायलन्‍स (पीएमएस) संशोधन यशस्‍वीरित्‍या पूर्ण झाल्याची घोषणा केली. सौम्‍य ते मध्‍यम कोविड-१९ रूग्‍णांवर फेव्हिपीरावीरची सुरक्षितता व परिणामकारकतेचे मूल्‍यांकन करण्‍यासाठी पीएमएस संशोधनाला जुलै २०२० मध्‍ये सुरूवात करण्‍यात आली. या संभाव्‍य, खुल्‍या, बहुकेंद्रित, एकमेव संशोधनामध्‍ये एकूण १०८३ रूग्‍णांची नोंद करण्‍यात आली.

निष्‍पत्तींमधून फेव्हिपीरावीरच्‍या वापरानंतर कोणतेही नवीन सुरक्षितता संकेत किंवा चिंता दिसण्‍यात आली नाही आणि अशक्‍तपणा, गॅस्ट्रिटिस, अतिसार, उलट्या इत्‍यादी सारखे पूर्वीपासून ज्ञात असलेले दुष्‍परिणाम मूलत: सौम्‍य असल्‍याचे आढळून आले. ताप बरा होण्‍याचा कालावधी ४ दिवस होता, तर वैद्यकीय उपचाराचा कालावधी ७ दिवस होता.ग्लेनमार्क चे पीएमएस संशोधन हे भारतामध्‍ये सौम्‍य ते मध्‍यम कोविड-१९ रूग्‍णांवरील फेव्हिपीरावीरच्‍या परिणामकारकतेचे मूल्‍यांकन करण्‍यासाठी करण्‍यात आलेली पहिली व सर्वात मोठी पोस्‍ट मार्केटिंग स्‍टडी आहे. मुंबई, बेंगळुरू, हैदराबाद, नाशिक, नागपूर व त्रिवंद्रम येथील तेरा शासकीय व खाजगी संस्‍थांनी या संशोधनामध्‍ये सहभाग घेतला. औषधाच्‍या मान्‍यताकृत संकेतानुसार रूग्‍णांचे संशोधन करण्‍यात आले.

ग्लेनमार्क फेव्हिपीरावीर (फॅबिफ्लू®) साठी भारतीय औषध नियामकाकडून प्रतिबंधित आपत्‍कालीन वापर मान्‍यता मिळणारी भारतातील पहिली कंपनी बनली, ज्‍यामुळे हे सौम्‍य ते मध्‍यम कोविड-१९ रूग्‍णांच्‍या उपचारासाठी भारतातील पहिले ओरल फेव्हिपीरावीर-मान्यताकृत औषध बनले. भारतातील कोविड-१९ प्रादुर्भावाची आपत्‍कालीन स्थिती पाहता त्‍वरित मान्‍यता प्रक्रियेचा भाग म्‍हणून या मान्‍यतेला मंजूरी देण्‍यात आली. या पीएमएस संशोधनाने बाजारपेठेमध्‍ये लाँच करण्‍यात आल्‍यानंतर देखील फेव्हिपीरावीर (फॅबिफ्लू®)ची सुरक्षितता व परिणामकारकतेचे मूल्‍यांकन करणे सुरूच ठेवले. संशोधनामधील रूग्‍णांचे सरासरी वय ४० वर्षे होते. तसेच संशोधनामधील रूग्‍णांमध्‍ये ४० टक्‍के महिला, तर ६० टक्‍के पुरूषांचा समावेश होता. या रूग्‍णांमध्‍ये उच्‍च रक्‍तदाब (११ टक्‍के) व मधुमेह (८ टक्‍के) हे दोन सर्वात सामान्‍य कोमोर्बिडीटीज दिसून आले. सर्व रूग्‍णांना ताप होता, त्‍यानंतर खोकला (८१ टक्‍के), थकवा (४६.२ टक्‍के) आणि चव न लागणे (४१ टक्‍के) ही लक्षणे दिसून आली.

इंडिया फॉर्म्‍युलेशन्‍सचे समूह उपाध्‍यक्ष व प्रमुख आलोक मलिक म्‍हणाले की  हे संशोधन महत्त्वाचे होते. या संशोधनाने वास्‍तविक जीवनात फॅबिफ्लू®ची सुरक्षितता व परिणामकारकतेचे मूल्‍यांकन केले, जेथे विविध परिवर्तनांचा निष्‍पत्तींवर परिणाम होऊ शकला असता. अशी स्थिती असताना देखील पीएमएस संशोधनाने सौम्‍य ते मध्‍यम कोविड-१९ रूग्‍णांमध्‍ये लक्षणांपासून आराम देण्‍यासोबत वैद्यकीय निष्‍पत्ती सुधारण्‍याप्रती फॅबिफ्लू®ची सातत्‍यपूर्ण क्षमता दाखवून दिली. ग्लेनमार्क व वैद्यकीय समुदायाचा हा पुढाकार आहे, ज्‍यामधून महामारीचा सामना करण्‍यामध्‍ये ओरल अॅण्‍टीव्‍हायरलचे विविध फायदे दिसून येतात.


Share this Newz