The Newz Biz Team, PIMPRI
फुगेवाडी येथील नावाजलेल्या साईनाथ मित्र मंडळाने यंदा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आणि वाढत्या प्रदूषणामुळे गणेशोत्सवात इकोफ्रेंडली देखावा साकारला आहे. मंडळाचे अध्यक्ष अनिल कल्लाप्पा जाधव आहेत.
सुरुवातीपासून मंडळ सामाजिक कार्यासाठी प्रसिध्द आहे. मंडळातर्फे विविध उपक्रम राबविले जातात. कोरोनामुळे उद्भवलेल्या कठीण काळातही मंडळातर्फे विविध उपक्रम राबविण्यात आले.
यंदा मंडळाने पर्यावरण वाचवा संदेश देत इकोफ्रेंडली गणेशोत्सव साजरा केला आहे. यामुळे नागरिकांमधून मंडळाचे कौतुक होत आहे.








Leave a Review