सांगवी फाट्याजवळ खांब उभे, पण सीसीटीव्ही कॅमेऱ्यांना मुहुर्त कधी मिळणार ?

भाजप ओबीसी मोर्चा प्रसिद्धीप्रमुख ललित म्हसेकर यांचा सवाल
Share this Newz

The Newz Biz Team, Pimpri

नवी सांगवी, सांगवी फाट्याजवळ सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यासाठी उभ्या केलेल्या खांबाला सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात यावेत, अशी मागणी भाजप ओबीसी मोर्चा प्रसिद्धीप्रमुख ललित म्हसेकर यांनी केली आहे.

याबाबत म्हसेकर यांनी पिंपरी-चिंचवडचे पोलीस आयुक्त कृष्णप्रकाश, पिपंरी-चिंचवड महापालिकेचे आयुक्त राजेश पाटील व सांगवी पोलीस चौकीचे पोलीस अधिकारी यांना ई मेल केला आहे.

सांगवी फाट्याकडून सांगवीकडे येणारा मार्ग हा रहदारीचा मार्ग आहे. बाबुराव घोलप महाविद्यालयाच्या प्रवेशद्वाराच्या नजीक वळणावर अनेकदा अपघात घडले आहेत. तसेच या परिसरात चोऱ्यांचे प्रकार सतत घडत आहेत. त्यामुळे ज्येष्ठ नागरिक, महिला वर्गात खूप भीतीचे वातावरण निर्माण झाले आहेत. तसेच त्या ठिकाणी पोलिस कर्मचाऱ्यांनाही मारहाणीचे प्रकार घडले आहेत.

वस्तुतः या ठिकाणी अनेक दिवसांपासून सीसीटीव्ही कॅमेऱ्यांसाठी खांब उभा केला आहे. पण त्याला सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आलेले नाहीत. त्यामुळे  इथली परिस्थिती लक्षात घेऊन या परिसरात जास्तीत जास्त सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात यावेत, अशी मागणी ललित म्हसेकर यांनी केली आहे.


Share this Newz