ओरिएंटल मार्व्हल सोसायटी तर्फे आयोजित रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद

Share this Newz

The Newz Biz Team, PIMPRI

ओरिएंटल मार्व्हल सोसायटी, केशवनगर, चिंचवडगाव तर्फे गणेशोत्सवानिमित्त सलग 6 व्या वर्षी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या उपक्रमास मोठा प्रतिसाद मिळाला. या शिबिरात 86 रक्तदात्यांनी रक्तदान केले.

यंदा कोरोना, तसेच वर्क फ्रॉम होमच्या कालावधीमध्ये सोसायटी सभासदांनी वेळेची तत्परता दाखवून कोरोना संबंधित सर्व उपाययोजना अवलंबित रक्तदान केले. वायसीएम रक्तपेढीचे डॉ. मुसर्गी यांच्या साहाय्याने हे रक्तदान शिबिर ठेवण्यात आले होते.

विशेषता या शिबिरामध्ये नर्मदा परिक्रमा पूर्ण केलेले श्री. ताम्हणकर यांनी देखील त्यांच्या 60 व्या वाढदिवसानिमित्त आज 160 वे रक्तदान सपत्नीक केले. तसेच रक्तदान शिबिरामध्ये विशेषत: सोसायटीतील बऱ्याच महिलांनी सहभाग नोंदवला.

यंदाचे रक्तदान शिबिराचे हे सलग 6 वे वर्षे आहे, यामध्ये सोसायटीचे अध्यक्ष- विशाल कुलकर्णी, साकेत भलगट, संतोष पाटील, सुनिल कांदळकर, अभिजीत बाबर, वरून कुलकर्णी, सुभाष जोशी, अभिजीत मांगले, हेमंत देशमुख, मनोज सग्रि, शाम कापरे, राजन पाटील, गणेश ओव्हाळ, श्री. लंके व सोसायटीमधील सदस्य, तसेच ओम निसर्ग मंडळ यांचे सहकार्य लाभले.


Share this Newz