गोदरेज लॉक्स अनावरण करत आहे #AgentofSafety या कोविड-१९ अभियानाच्या दुसऱ्या टप्प्याचे, कोविड-१९ योद्ध्यांना सलाम करणारे अभियान

Share this Newz

The Newz Biz Team, PUNE

गोदरेज अँड बॉयस या गोदरेज ग्रुपच्या फ्लॅगशिप कंपनीने आज अशी घोषणा केली की, कंपनीच्या गोदरेज लॉक्स या व्यवसायाने आपल्या #AgentofSafety या कोविड-१९ अभियानाच्या दुसऱ्या टप्प्याचे अनावरण केले. या उपक्रमाच्या माध्यमातून कंपनीने, या कसोटीच्या काळात गरजू नागरिकांच्या सुरक्षिततेची काळजी घेणारे कोविड-१९ योद्धे शोधले आणि त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त केली. गोदरेज लॉक्स यातील काही असामान्य योद्ध्यांपर्यंत पोहोचली आणि नि:स्वार्थपणे काम करणाऱ्या या लोकांच्या प्रेरणादायी कहाण्या कंपनीने सर्वांपुढे आणल्या. या कथा स्वत: योद्ध्यांनी सांगितल्या आहेत. त्यांनी त्यांच्या उपक्रमावर प्रकाश टाकला आहे, त्यांनी सुरक्षिततेसाठी केलेले उपाय सर्वांना सांगितले आहेत आणि त्याचबरोबर एक #AgentofSafety म्हणून नागरिकांना संदेश दिला आहे. या कथांचे व्हिडिओ www.hargharsurakshit.com येथे उपलब्ध आहेत. #AgentofSafety हा उपक्रम हर घर सुरक्षित या गोदरेज लॉक्सच्या राष्ट्रव्यापी जनजागृती अभियानाचा भाग आहे. लोकांना सुरक्षिततेबद्दल जागरूक करण्याचे काम हे अभियान करते.

कोविड-१९ साथीच्या दुसऱ्या लाटेने कळस गाठला तेव्हा देशभरातील नागरिक गरजूंना मदत करण्यासाठी पुढे आले. देशभरातील अशा काही सेवाभावी व्यक्तींच्या प्रयत्नांची दखल गोदरेज लॉक्स #AgentofSafety उपक्रमाच्या माध्यमातून घेत आहे. मुंबईमध्ये डॉ. मार्कस रॅने आणि डॉ. रैना रॅने यांनी दुसऱ्या लाटेचा परिणाम प्रत्यक्ष बघितला आणि काहीतरी करण्याचे ठरवले. त्यांनी मेड्स फॉर मोअर हा अनोखा उपक्रम सुरू केला. यामध्ये न वापरलेल्या कोविड औषधांचे संकलन केले जाते आणि ज्यांना ही औषधे विकत घेणे परवडत नाही अशा रुग्णांना ती पुरवली जातात. यामुळे वंचित घटकांमधील रुग्णांना प्राणरक्षक औषधे उपलब्ध करून देण्यात खूप मदत झाली. अन्यथा ही औषधे खरेदी करणे या रुग्णांच्या आवाक्याबाहेरील होते.

भोपाळ येथे राहणारे विजय अय्यर यांची कथाही प्रेरक आहे. ते त्यांच्या दुचाकी वाहनावरून निघतात, घरे निर्जंतुक करून देतात आणि कोविड-१९ संदर्भातील सुरक्षिततेचा संदेश सर्वांना देतात. लोकांना घरातच राहण्याचे व सामाजिक संपर्क मर्यादित राखण्याचे आवाहन करतात. ओडिशातील भिबुदत्त पांडा त्यांच्या जवळपास पाहणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांना अत्यावश्यक वस्तू घरपोच देतात. ते अद्याप सुमारे २०० कुटुंबांना मदत करत आहेत. त्यांनी गंभीर स्थितीतील रुग्णांची गरज पूर्ण करण्यासाठी रक्तदात्यांचाही डेटाबेस तयार केला आहे. दुर्मिळ गटांचे रक्तही याद्वारे उपलब्ध होऊ शकते. जेआयटीओ चेन्नईचे संचालक तसेच जेआयटीओ डॉक्टर ऑन कॉलचे प्रकल्प निमंत्रक कुमारपाल आर चोप्रा यांनी ऑक्सिजन ऑन व्हील्स सेवा कशी सुरू केली याचा अनुभव सर्वांना सांगितला आहे. यामध्ये वापरात नसलेल्या बसेसमध्ये थोडे फेरफार करून त्यांत ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर्स बसवण्यात आले आणि रुग्णांना ही सेवा मोफत उपलब्ध करून देण्यात आली.

पन्ना श्रीमाली हा पटना येथील पार्श्वगायक पीपीई किट घालून बाहेर पडतो आणि कोविड-पॉझिटिव रुग्णांना भासणारी अन्न व औषधांची गरज पूर्ण करण्यात मदत करतो. एप्रिल २०२१ पासून तो अविश्रांतपणे लोकांना मदत करत आहे आणि दररोज ५०० कोविड रुग्ण व ज्येष्ठ नागरिकांपर्यंत त्याची सेवा पोहोचत आहे. आपल्या आजारी आईची काळजी घेण्यासाठी अमेरिकेतून परत आलेला तरुण कप्पाला देशातील भीषण स्थिती बघून हलून गेला. हे सगळे नुसते बघत राहण्यापेक्षा या लढ्यात सहभागी होण्याचा निर्णय त्याने घेतला. कोविड रुग्णांची कोणतेही शुल्क न आकारता एका तात्पुरत्या तयार केलेल्या रुग्णवाहिकेतून वाहतूक करण्याचे काम त्याने सुरू केले.

गोदरेज लॉक्सचे ईव्हीपी आणि बिझनेस हेड श्याम मोटवानी या उपक्रमाबद्दल म्हणाले, “यावर्षी कोविडच्या दुसऱ्या लाटेत, या विषाणूने लोकांच्या आयुष्यांवर आणि अर्थव्यवस्थेवर खूप खोलवर परिणाम केला. मात्र, नागरिकांनी उत्तम स्थितीस्थापकत्व दाखवून गरजूंना मदत करण्यासाठी अथक प्रयत्न केल्याची उदाहरणेही खूप आहेत.


Share this Newz