The Newz Biz Team, PIMPRI
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, कादंबरी प्रतिष्ठान व कै. शांताराम बाईत प्रतिष्ठान तर्फे शेवटच्या श्रावणी सोमवारनिमित्त दापोडी गावठाण येथे महिला भजनी मंडळच्या महिलांना पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.
विठ्ठल रूक्मिणी महिला भजनी मंडळ, पवार वस्ती, फिंरगाई महिला भजनी मंडळ, खालील आळी, विठ्ठल रूक्मिणी महिला भजनी मंडळ, वरिल आळी जय गणेश महिला मंडळ, भजनी गणेश आंगण, नारीशक्ती महिला भजनी मंडळ या सर्व भजनी मंडळांना शाल, श्रीफळ स्मृतीचिन्ह देऊन नगरसेविका स्वाती (माई)काटे, अस्मिता कांबळे, माधवी बाईत यांच्या हस्ते गौरविण्यात आले.
या वेळी विनायकअण्णा काटे (उपाध्यक्ष राष्ट्रवादी युवक काँग्रेस पार्टी पिं चिं शहर ) जयवंत मोरे, मंगल जाधव, उषा भोसले, सत्यभामा जाधव, कांचन जाधव, मधुमती शिंदे, वनीता काळे, उज्वला मुदगल उपस्थित होते. तसेच सर्व भजनी मंडळाच्या महिला उपस्थित होत्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रविंद्र बाईत यांनी केले.







Leave a Review