The Newz Biz Team, PUNE
स्केचर्स, द कम्फर्ट टेक्नॉलॉजी कंपनीने आर्च फिट स्टाईल्सचे ऑटम विंटर २०२१ कलेक्शन भारतात दाखल केले आहे. नव्या आर्च फिट कलेक्शनमध्ये कॅज्युअलपासून फिटनेसपर्यंत अनेक वेगवेगळ्या प्रकारचे शूज आहेत, जे तुम्हाला प्रत्येक वेळी सर्वोत्कृष्ट आराम मिळवून देतात. पुरुष व स्त्रिया दोघांसाठी देखील हे उपलब्ध असून सतत सक्रिय असलेल्या व्यक्तींसाठी अतिशय विचार करून हे सपोर्टिव्ह पेयर्स बनवण्यात आले आहेत. भारतात या वर्षीच्या सुरुवातीला सादर करण्यात आलेल्या स्केचर्स आर्च फिट स्नीकर्सला मिळालेल्या भरघोस यशापासून प्रेरणा घेत कंपनीने आर्च सपोर्ट फूटवेयरची ही विस्तारित श्रेणी आणली आहे.
स्केचर्स आर्च फिट फूटवेयर म्हणजे सुविधा आणि आराम, दररोज वापरण्याच्या स्नीकर्सपासून सँडल्सपर्यंत विविध फूटवेयर्समध्ये अधिक जास्त सुधारित आर्च सपोर्ट देणारे असे हे फूटवेयर आहे. स्केचर्स आर्च फिट यंत्रणा तुमचा पाय अशा रितीने ठेवण्यात मदत करते ज्यामुळे पायाला धक्के बसणे कमी होते, आणि संपूर्ण दिवसभर पायांना आराम मिळतो. या कलेक्शनमधील प्रत्येक पादत्राण वजनाला हलके आहे, यांचे पोडिआट्रिस्टनी डिझाईन केलेले आकार २० वर्षांच्या माहितीवर आणि १२०००० अनवेटेड फूट स्कॅन्सवर आधारित आहेत.
यातील निवडक जोड्यांमध्ये विविध प्रकारची ट्रेडमार्क्ड स्केचर्स कम्फर्ट तंत्रज्ञाने आणि डिझाईन घटक आहेत, यामध्ये गोवॉक आर्च फिट स्टाईल्समधील अधिक जास्त आधारासाठी वापरण्यात आलेले हाय-रिबाउंड कम्फर्ट पिलर™ तंत्रज्ञान ते मॅक्स कुशनिंग आर्च फिट स्नीकर्समधील वजनाला हलके व रिस्पॉन्सिव्ह अल्ट्रा गो कुशनिंग यांचा समावेश आहे.
स्केचर्स, साऊथ एशिया प्रायव्हेट लिमिटेडचे सीईओ राहुल विरा म्हणाले की ग्राहकांना सर्वोत्कृष्ट आराम देणारी उत्पादने बनवण्यावर स्केचर्सचा नेहमीच भर असतो. पावलांना अधिक चांगला आधार मिळावा ही ग्राहकांची वाढती मागणी समजून घेऊन ती पूर्ण करण्यासाठी आम्ही स्केचर्स आर्च फिट तयार केले आहे आराम आणि तंत्रज्ञान हे स्केचर्सचे मूलभूत गुणधर्म आहेत आणि आमच्या या नवीन कलेक्शनमध्ये त्यांचा पुरेपूर मेळ साधला गेला आहे.











Leave a Review