The Newz Biz Team, PUNE
स्वातंत्र्य दिनाच्या अमृत महोत्सवानिमित्त औरंगाबाद येथील जय किशन शिक्षण संस्थेच्या भगवान बाबा बालक आश्रमच्या वतीने सांगवीतील महेश मंडळाचे अध्यक्ष सतीश लोहिया यांचा ‘भगवान बाबा समाज भूषण पुरस्काराने’ सन्मान करण्यात आला.
लोहिया यांना भगवान बाबा बालिका आश्रम संस्थेचे अध्यक्ष नितीन घुगे, सचिव कविता वाघ यांच्या हस्ते पुरस्कार देण्यात आला. औरंगाबाद येथे झालेल्या या कार्यक्रमाला महाराष्ट्र प्रदेश माहेश्वरी सभा अध्यक्ष किसन भन्साळी, संयुक्त मंत्री संजय मंत्री, औरंगाबाद जिल्हा अध्यक्ष सतिश लढा यांच्या आदी मान्यवर उपस्थित होते.
पुरस्काराला उत्तर देताना महेश मंडळाचे अध्यक्ष सतीश लोहिया म्हणाले, स्वातंत्र्य दिनाच्या अमृत महोत्सवानिमित्त भगवान बाबा बालिका आश्रमाच्या वतीने ‘भगवान बाबा समाज भूषण पुरस्काराने’ सन्मान केल्याबद्दल संस्थेचे मनापासून आभार मानतो. हा पुरस्कार मिळाल्यामुळे समाज कार्य करण्यासाठी एक नवी उर्जा आणि प्रेरणा मिळणार आहे. हा माझा सन्मान नसून हा सर्व माहेश्वरी समाजाचा सन्मान आहे. हा पुरस्कार सांगवी परिसर महेश मंडळाच्या सर्व माहेश्वरी समाजाला समर्पित करतो.







Leave a Review