The Newz Biz Team, MUMBAI
महामारीच्या या काळात भारतातील आरोग्यसेवा यंत्रणेला सुधारित पाठिंबा देण्यासाठी स्टेट बँक ऑफ इंडियाने आरोग्यम हेल्थकेयर व्यावसायिक कर्ज योजना लाँच केली आहे. या नव्या उत्पादनाअंतर्गत संपूर्ण आरोग्य यंत्रणा उदा. हॉस्पिटल्स, नर्सिंग होम्स, डायग्नोस्टिक केंद्रे, पॅथॉलॉजी लॅब्ज, उत्पादक, पुरवठादार, अत्यावश्यक आरोग्यसेवा पुरवठा करणाऱ्या आयातदार लॉजिस्टिक फर्म्स यांदा 100 कोटी रुपयांपर्यंतचे कर्ज (भौगोलिक ठिकाणानुसार) उपलब्ध करून दिले जाणार असून त्याची 10 वर्षांत परतफेड करता येणार आहे.
आरोग्यम कर्ज मुदत कर्जाच्या स्वरुपात घेऊन विस्तार/आधुनिकीकरणासाठी किंवा कॅश क्रेडिट, बॅकं गॅरंटी/लेटर ऑफ क्रेडिट अशा खेळत्या भांडवल सुविधांच्या रुपात वापरता येईल. मेट्रो केंद्रांमध्ये आरोग्यमअंतर्गत 100 कोटी रुपयांपर्यंतचे कर्ज उपलब्ध होईल, पहिल्या श्रेणीतील आणि शहरी केंद्रांमध्ये 20 कोटी रुपयांपर्यंतचे कर्ज तर तिसऱ्या ते सहाव्या श्रेणीपर्यंत 10 कोटी रुपयांपर्यंतचे कर्ज मिळेल.
2 कोटी रुपयांपर्यंत कर्ज घेणारे लाभधारक युनिट्स/कर्जदार कंपन्यांना बँकेला कोणतेही तारण किंवा सुरक्षा द्यावी लागणार नाही कारण हे कर्ज गॅरंटी स्कीम ऑफ क्रेडिट गॅरंटी फंड ट्रस्ट फॉर मायक्रो अँड स्मॉल एंटरप्राइजेस (सीजीटीएमएसई) अंतर्गत कव्हर केले जाणार आहे.
एसबीआयचे अध्यक्ष दिनेश खारा हे उत्पादन लाँच करताना म्हणाले, ‘आपली आरोग्यसेवा यंत्रणा महामारीच्या काळात गेल्या वर्षभरापासून अखंडित आणि असामान्य पाठिंबा देत आहे. कोविड- 19 संसर्गाच्या काळात त्यांचे योगदान लक्षात घेऊन त्याची दखल घेण्यासाठी आरोग्यम हेल्थकेयर बिझनेस लोन योजना लाँच करताना आम्हाला आनंद होत आहे. आमच्या मते हे खास कर्ज उत्पादन सद्य केंद्रांना विस्तार /आधुनिकीकरणासाठी, तसेच नव्या सुविधांच्या निमिर्तीसाठी अतिशय गरजेचा आर्थिक पाठिंबा देईल. आरोग्यम हेल्थकेयर बिझनेस लोन योजनेच्या माध्यमातून संपूर्ण देशभरातील आरोग्यसेवा पायाभूत सुविधा मजबूत करण्याचा आमचा प्रयत्न आहे.
आरोग्यम हेल्थकेयर बिझनेस लोन योजना आरबीआयने कोविड मदत उपाययोजनांचा भाग म्हणून जाहीर केलेल्या व बँकांनी तयार केलेल्या कोविड लोन बुकअंतर्गत पात्र असेल.











Leave a Review