एमआयटी एडीटी विद्यापीठात शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी सहकारी पतसंस्थेची स्थापना

Share this Newz

The Newz Biz Team, PUNE

कर्मचाऱ्यांच्या आर्थिक व सामाजिक उन्नतीसाठी व त्यांना त्यांच्या गरजेच्यावेळी सहजरित्या आर्थिक मदत उपलब्ध करुन देण्याच्या उद्देशाने ‘एमआयटी आर्ट, डिझाईन आणि टेक्नॉलॉजी विद्यापीठातील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी सहकारी पतसंस्था मर्या’ ची स्थापना करण्यात आली.

माईर्स एमआयटी शिक्षण संस्था समुहाचे संस्थापक व एमआयटी एडीटी विद्यापीठाचे अध्यक्ष प्रा. डॉ. विश्वनाथ. दा. कराड यांच्या संकल्पनेतून आणि एमआयटी एडीटी विद्यापीठाचे कार्याध्यक्ष प्रा. डॉ. मंगेश कराड यांच्या मार्गदर्शनाखाली ही पतसंस्था स्थापन करण्यात आली आहे. यासंबंधीचे उपनिबंधक सहकारी संस्था पुणे, महाराष्ट्र यांच्याकडून नोंदणी प्रमाणपत्र प्राप्त झाले आहे, आशी माहिती पतसंस्थेचे चेअरमन डॉ. महेश चोपडे यांनी दिली.

प्रा. डॉ. मंगेश कराड म्हणाले, की पतसंस्था स्थापन करण्यामागे सभासदांना काटकसर, स्वावलंबन व सहकाराचा प्रसार करण्यास प्रोत्साहन देणे, भागभांडवल स्वीकारणे, सभासदांकडून ठेवी स्वीकारणे, कमी व्याज दराने कर्ज उपलब्ध करून देणे, जामीनावर कर्ज देणे, गरजू सभासदांना तात्काळ कर्ज उपलब्ध करून देणे हे उद्देश ठेवण्यात आले आहे.


Share this Newz