The Newz Biz Team, PIMPRI
कोरोनाच्या पार्श्वभूमीमुळे निर्माण झालेला रक्ताचा तुटवडा लक्षात घेऊन पिंपळे गुरव येथे माजी नगरसेवक राजेंद्र जगताप मित्र परिवार व कै.गणपतराव जगताप प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधत २२ जुलैला रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
राज्यातील विविध ठिकाणी उपचार घेत असलेल्या रुग्णांसाठी रक्ताची मागणी वाढत आहे. रक्तपेढ्यांमध्ये रक्ताचा तुटवडा भासू नये यासाठी राज्य सरकार प्रयत्नशील असून, नागरिकांनी रक्तदान करण्यासाठी पुढे यावे असे आवाहन केलेले आहे.
दरम्यान, रक्तदान हेच श्रेष्ठ दान या जाणीवेतुन शेकडो रक्तदात्यानी पिंपळे गुरवमध्ये होणार्या या शिबिरामध्ये रक्तदान करण्याचा निर्धार केला असून रक्तदात्यांना प्रोत्साहन मिळावे या उद्देशाने संयोजकांच्या वतीने या शिबिरात सहभागी होणार्या प्रत्येक रक्तदात्यास गौरवपत्र तसेच प्रोटीन सप्लिमेंट भेट स्वरुपात देण्यात येणार आहे. रक्तदान शिबिरात सहभागाकरिता नावनोंदणी करण्यासाठी साहेबराव तुपे (मोबा.9922277797 ) व शैलेश दिवेकर (मोबा.9823143905 ) यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन माजी नगरसेवक राजेंद्र जगताप यांनी केले आहे.







Leave a Review