The Newz Biz Team, PIMPRI
पिंपळे गुरव मधील सामाजिक कार्यकर्ते व उद्योजक ज्ञानेश्वर(माऊली) जगताप यांच्या वाढदिवसानिमित्त सामाजिक बांधिलकी म्हणून ओम साई फाउंडेशनकडून डॉक्टर व कर्मचारी यांना आमदार लक्ष्मण जगताप व मा.नगरसेवक शंकर जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली ओम साई फाउंडेशनचे अध्यक्ष संजय मराठे यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन सन्मानपत्र देण्यात आले. तसेच लॉकडाऊन काळात खऱ्या अर्थाने नागरिकांकडून लॉकडाऊनचे पालन करून घेणारे महाराष्ट्र पोलीस दलातील कर्तव्य दक्ष पोलीस कर्मचारी यांना पुष्पगुच्छ व सन्मान पत्र देण्यात आले.
संजय मराठे यांनी सांगितले, की माऊली जगताप यांनी तरुण पिढीला सामाजिक कामाचा आदर्श घालून दिलेला आहे. कोविडीच्या काळात अनेक नागरिकांना त्यांनी मदत केली. त्यांच्या या आदर्शवादी कार्याकडून प्रेरित होऊन खऱ्या कोरोना योद्धाचा सन्मान करण्यात आला.
अहिल्याबाई होळकर मराठी शाळा लसीकरण केंद्र जुनी सांगवीचे प्रमुख वैद्यकीय अधिकारी डॉ. भूषण पाटील व त्यांचे सहकारी, निळू फुले नाट्यगृह लसीकरण केंद्रच्या डॉ. मृणाल राजगुरू व त्यांचे सहकारी, तसेच सांगवी पोलीस पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रंगनाथ उंडे व त्यांच्या सहकाऱ्यांना पुष्पगुच्छ व सन्मानपत्र देण्यात आले.
यावेळी अध्यक्ष संजय मराठे, सामाजिक कार्यकर्ते साई कोंढरे, संजय पाटील, दिलीप अंकुश, रमेश चौधरी, अभिजीत बागुल-अध्यक्ष (भाजपा युवा मोर्चा, प्रभाग क्रं 29), शुभम फरांदे-अध्यक्ष (भाजपा युवा मोर्चा,प्रभाग क्रं 31) व इतर मान्यवर उपस्थित होते.







Leave a Review