The Newz Biz Team, KARMALA
केम प्राथमिक आरोग्य केंद्रात सातोली गावातील शंभर नागरिकांना नऊ जुलै रोजी दुपारी तीन ते पाच या वेळेत गटनेते आबासाहेब साळुंखे यांच्या उपस्थितीत लसीकरण करण्यात आले.
प्राथमिक आरोग्य केंद्राचे कर्तव्यदक्ष वैद्यकीय अधिकारी संतोष पालखे ,डॉक्टर विशाल पालके यांच्या निरीक्षणाखाली नियोजन करून आरोग्य सेविका लीलाबाई मेंगाळ, सुवर्णा बरगे, समूह आरोग्य अधिकारी निलेश कुबेर, शितल घायाळ, आरोग्य सेवक दत्ता कावळे, गटप्रवर्तक स्वाती गोरे यांनी यशस्वी लसीकरण करण्यासाठी प्रयत्न केले .सातोली गाव कोरोनाच्या हिटलिस्टवर होते. त्यामुळे जवळपास गावांमध्ये दहा ते बारा जणांचा मृत्यू झाला. याची दखल घेऊन या गावाला खास बाब म्हणून १०० डोस आमदार संजय मामा शिंदे यांच्या सहकार्याने व आबासाहेब साळुंखे यांच्या प्रयत्नातून मिळाली होती. तिचे लसीकरण करण्यात आले .
यावेळी माजी सरपंच रोहिणी साळुंके, नितीन साळुंखे डॉक्टर भालचंद्र साळुंके, दीपक साळुंके, ज्ञानेश्वर भोगे, बंडू भोगे, अमोल मुटेकर, पोलीस पाटील अनिल साळुंखे आदी उपस्थित होते.







Leave a Review