The Newz Biz Team, PIMPRI
“अशी पाखरे येती आणिक स्मृती ठेवूनी जाती, दोन दिसांची रंगत संगत, दोन दिसांची नाती,” अशीच काहीशी अवस्था झाली होती कन्या विद्यालयाच्या1995 सालच्या विद्यार्थिनींची.
कन्या विद्यालय पिंपरी वाघेरे येथे 1995 सालच्या 12 माजी विद्यार्थिनी विद्यालयातील इयत्ता 9 वीच्या गरीब, होतकरू विद्यार्थिनीस पुस्तक संच भेट देण्यासाठी आल्या.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्व नियमांचे पालन करून एक छोटेखानी कार्यक्रम झाला.
प्रथमतः विद्यालयाच्या माजी विद्यार्थिनी आणि सध्याच्या उपशिक्षिका श्रीमती काकडे मॅडम यांनी सर्वांचे स्वागत केले. विद्यालयातील ज्येष्ठ शिक्षिका ऊनउने मॅडम यांनी अध्यक्षीय प्रस्ताव केला. विद्यालयाच्या पर्यवेक्षिका पाटील यु बी मॅडम यांनी प्रस्ताविक केले. विविध क्षेत्रात आपला ठसा उमटविणाऱ्या माजी विद्यार्थिनींचा परिचय करून देत गुलाब पुष्प देऊन त्यांचे स्वागत करण्यात आले.
इयत्ता नववीच्या पाठ्यपुस्तकाचे पंचवीस हजार किमतीचे एकूण पन्नास संच विद्यालयास भेट दिले. त्यापैकी पाच विद्यार्थिनींना प्रातिनिधिक स्वरूपात पुस्तक संच वाटप करण्यात आले.
माजी विद्यार्थीनींनीपैकी शैला रंधवे, रोहिणी इंगळे, कैवल्या भालेकर आणि हेमलाता भिलारे यांनी आपल्या शालेय जीवनातील स्मृतींना उजाळा दिला. कन्या विद्यालयातील शिक्षकांनी लावलेली शिस्त, दिलेले संस्कार, प्रेम याविषयी आदर व्यक्त केला.
विद्यालयाच्या मुख्याध्यापिका शेटे एस. एस. यांनी अध्यक्षीय मनोगत व्यक्त केले. ज्येष्ठ शिक्षिका कांबळे व्ही. बी. यांनी आभार मानले. कार्यक्रमाचे नियोजन व सूत्रसंचालन विद्यालयाच्या उपशिक्षिका काकडे आर.आर. यांनी केले.







Leave a Review