The Newz Biz Team, PUNE
किर्लोस्कर न्यूमॅटिक कंपनी लि. मधील नैसर्गिक ग्रीन वॉल व्हर्टिकल गार्डनची सर्वात मोठी नैसर्गिक ग्रीन वॉल एशिया बुक ऑफ रेकॉर्ड 2021 मध्ये नोंद झाली आहे.
एशिया बुक ऑफ रेकॉर्डचे परीक्षक विश्वदीप राय चौधरी यांनी परीक्षण करून किर्लोस्कर न्यूमॅटिक कंपनी लिमिटेडमधील या नैसर्गिक ग्रीन वॉल सर्वात मोठी नेचर वॉल म्हणून नोंद झाल्याचे प्रमाणपत्र व सन्मान पदक देऊन घोषणा केली.
या ग्रीन वॉलची लागवड सन 2009 मध्ये केली होती. जेव्हा कंपनीचे आवारातून पुणे सोलापूर रोडवरील फ्लायओव्हरची बांधणी झाली. त्या फ्लायोवरच्या पायथ्याशी वाघ नाझी वेल याची रोपे समान लागवड करण्यात आली होती. गेल्या अकरा वर्षाच्या कालावधीत सदर वेलीने एक विशाल रूप धारण केले. 16 हजार स्केअर फुट व्हर्टिकल ग्रीन वॉलमध्ये त्याचे रूपांतर झाले. या अथांग अशा व्हर्टिकल ग्रीन वॉलमध्ये विविध प्रकारचे पक्षी ,सरपटणारे प्राणी, आणि फुलपाखरे इत्यादी जीवसृष्टी निर्माण झालेली आहे. या व्हर्टिकल ग्रीन वॉलमुळे कंपनी परिसरात तापमान कमी होऊन प्रदूषणास आळा बसलेला आहे.
सदर वर्टीकल ग्रीनमध्ये कंपनीचे माजी व्यवस्थापकीय संचालक आदित्य कौशिक, कंपनीचे विद्यमान व्यवस्थापकीय संचालक के श्रीनिवासन ,या विभागाचे व्हाईस प्रेसिडेंट सदाशिव पाठी, फॅक्टरी मॅनेजर गणेश चौधरी ,कंपनीच्या स्टेट अँड इन्व्हरमेंट विभागाचे अधिकारी प्रकाश कुलकर्णी व मंगेश कुलकर्णी यांचे वेळोवेळी मार्गदर्शन व योगदान लाभले आहे.
या कार्यक्रमावेळी एशिया कप रेकॉर्ड विश्वदीप रॉय चौधरी ,एसपी कॉलेजच्या बॉटनी डिपारमेंटच्या अनुराधा कुलकर्णी , किर्लोस्कर न्यूमॅटिक कंपनी तर्फे अमोल राहुल किर्लोस्कर, सदाशिव पाटील गणेश चौधरी , सचिन मजुमदार, प्रकाश कुलकर्णी, मंगेश कुलकर्णी, सौम्य व युनिक लॅबचे कौशल कुलकर्णी उपस्थित होते , एशिया बुक ऑफ रेकॉर्ड कडून अमान राहुल किर्लोस्कर यांनी कंपनीतर्फे सन्मान पदक व प्रमाणपत्र स्विकारले. गणेश चौधरी यांनी आभार व्यक्त केले.







Leave a Review