पहिलीच शपथ घेतली नारायण राणेंनी; शपथ ग्रहण सोहळ्याला सुरुवात

Share this Newz

The Newz Biz Team, NEW DELHI

मोदी मंत्रिमंडळ विस्ताराचा शपथविधी सोहळा सुरू झाला असून, राष्ट्रपती भवन येथील दरबार हॉलमध्ये शपथविधी सोहळा पार पडत आहे. नारायण राणे यांनी पहिलीच शपथ घेतली असून, त्यांनी हिंदीतून शपथ घेतली.

तत्पूर्वी १२ विद्यमान मंत्र्यांनी राजीनामे दिले असून आज ४३ मंत्र्यांनी मंत्री पदाची शपथ घेतली. यामध्ये महाराष्ट्रातील ४ खासदारांचा समावेश आहे. त्यात नारायण राणे, भारती पवार, कपिल पाटील आणि भागवत कराड यांनी मंत्री पदाची शपथ घेतली.

केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तारानंतर पहिलीच शपथ नारायण राणे यांनी घेतली. काँग्रेसमधून बाहेर पडून भाजपामध्ये दाखल झालेल्या ज्योतिरादित्य शिंदे यांचाही मंत्रिमंडळात समावेश करण्यात आला आहे. यांनीही हिंदीतून शपथ घेतली आहे. ज्योतिरादित्य शिंदे काँग्रेसमध्ये असताना राहुल गांधींच्या जवळचे मानले जात होते.

पशुपती कुमार पारस , किरेन रिजीजू, आणि राजकुमार सिंह यांना केंद्रीय मंत्रिपदाची शपथ देण्यात आली. डॉ. विरेंद्र कुमार, रामचंद्र प्रसाद सिंह , आश्विनी वैष्णव यांनाही मंत्रिपदाची शपथ

सर्बानंद सोनोवाल आसामचे माजी मुख्यमंत्री यांनी केंद्रीय मंत्रिपदाची शपथ घेतली. विधानसभा निवडणुकीत भाजपला यश मिळवून देण्यात त्यांनी मोठी कामगिरी बजावली.

दरम्यान, केंद्रातील विद्यमान मंत्र्यांपैकी आरोग्यमंत्री हर्ष वर्धन, प्रकाश जावडेकर, रवीशंकर प्रसाद यांनी देखील राजीनामे दिले आहेत. राष्ट्रपती भवनातील दरबार हॉलमध्ये हा शपथविधी सोहळा पार पडत आहे.

दरम्यान, आज सायंकाळी बहुचर्चित केंद्रीय मंत्रिमंडळात विस्‍ताराची यादी आज जाहीर झाली. यामध्‍ये महाराष्‍ट्रातील चार खासदारांना संधी मिळाली. यामध्‍ये ज्येष्ठ नेते नारायण राणे आणि भिवंडीचे खासदार कपिल पाटील, भागवत कराड आणि भारती पवार यांचा समावेश आहे.


Share this Newz