मोदी मंत्रीमंडळाचा विस्तार; आरोग्यमंत्री हर्षवर्धन, प्रकाश जावडेकरांसह 12 मंत्र्यांना डच्चू

Share this Newz

The Newz Biz Team, NEW DELHI

पंतप्रधान नरेंद्र मोदी केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार करीत असून, आज एकूण 43 मंत्र्यांची मंत्रीमंडळात वर्णी लागली आहे. यामध्ये महाराष्ट्रातील चौघांचा समावेश आहे. तर आरोग्यमंत्री हर्षवर्धन, प्रकाश जावडेकरांसह 12 मंत्र्यांना डच्चू देण्यात आला आहे. पंतप्रधान मोदींच्या खास मंत्र्यांमधील प्रकाश जावडेकर यांचाही राजीनामा घेतल्याने आश्चर्य व्यक्त केले आहे.

नियमांनुसार मोदी मंत्रिमंडळात जास्तीत जास्त 81 मंत्री असू शकतात. सध्या मंत्रिमंडळात 53 मंत्री होते. या अर्थाने 28 मंत्र्यांना सामिल होण्याची शक्यता होती. विद्यमान 12 मंत्र्यांच्या राजीनाम्यानंतर मोदी 39 मंत्र्यांना सामिल करु शकतात. आज ज्या 43 मंत्र्यांना शपथ दिली जाईल, त्यांच्यामध्ये काही सध्याचे राज्यमंत्रीही असतील, ज्यांना कॅबिनेटमध्ये प्रमोट केले जाईल.

दुसरीकडे जुन्या मंत्र्यांच्या राजीनाम्याची प्रक्रियाही सुरू झाली आहे. केंद्रीय आरोग्यमंत्री हर्षवर्धन यांनी राजीनामा दिला आहे. असे मानले जाते की देशातील कोरोनाच्या दुसर्‍या लाटेच्या वेळी विस्कळीत झालेली आरोग्य सेवा त्यांच्या राजीनाम्याचे कारण बनले.

राजीनामा देणाऱ्या मंत्र्यांची नावे

  1. सदानंद गौड़ा, रविशंकर प्रसाद, थावर चंद गहलोत, रमेश पोखरियाल निशंक, हर्षवर्धन, प्रकाश जावडेकर, संतोष कुमार गंगवार, बाबुल सुप्रियो संजय धोत्रे, रत्तन लाल कटारिया, प्रताप चंद सारंगी, देबोश्री चौधरी

आज शपथ घेणाऱ्या 43 मंत्र्यांची नावे निश्चित करण्यात आली आहेत. नियमांनुसार मोदी मंत्रिमंडळात जास्तीत जास्त 81 मंत्री असू शकतात. आज ज्या मंत्र्यांना शपथ दिली जाईल त्यांच्यात काही सध्याचे राज्यमंत्रीही असतील, ज्यांना कॅबिनेटमध्ये प्रमोट केले जाऊ शकते.

केंद्रीय मंत्रिमंडळात वर्णी लागलेले मंत्री : 
ठळक अक्षरात महाराष्ट्रातील मंत्री
1. नारायण राणे 2. सर्वानंद सोनोवाल 3. वीरेंद्र कुमरा 4. ज्योतिरादित्य सिंधिया 5. आरसीपी सिंह 6. अश्विनी वैष्णव 7. पशुपति कुमार पारस 8. किरण रिजिजू 9. राजकुमार सिंह 10. हरदीप सिंह पुरी 11. मनसुख मंडाविया 12. भूपेंद्र यादव 13. पुरुषोत्तम रूपाला 14. जी किशन रेड्डी 15. अनुराग ठाकुर 16. पंकज चौधरी 17. अनुप्रिया पटेल 18. सत्यपाल सिंह बघेल 19. राजीव चंद्रशेखर 20. शोभा करंदलाजे 21. भानुप्रताप सिंह वर्मा 22. दर्शना विक्रम जरदोश 23. मीनाक्षी लेखी 24. अन्नपूर्णा लेखी 25. ए नारायण स्वामी 26. कौशल किशोर 27. अजय भट्ट 28. बीएल वर्मा 29. अजय कुमार 30. देवसिंह चौहान 31. भगवंत खूबा 32. कपिल पाटील 33. प्रतिमा भौमिक 34. सुभाष सरकार 35. भागवत कृष्ण राव कराड 36. राजकुमार रंजन सिंह 37. भारती प्रवीण पवार 38. विश्वेश्वर टुडू 39. शांतनु ठाकुर 40. महेंद्र भाई मुंजापारा 41. जॉन बारला 42. एल मुरुगन 43. नीतीश प्रामाणिक

Share this Newz