कंदरमध्ये कोरोना योद्ध्यांचा सन्मान

Share this Newz

The Newz Biz Team, KARMALA

कोरोना काळात बजावली होती महत्त्वाची भूमिका
कंदर:कोरोनाची दुसरी लाट सुरू झाली. आणि देशात कोरोनाने हाहाःकार माजवला. कोरोना रूग्णांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढू लागली. रूग्णालयात बेड मिळेनासे झाले होते. अशा वेळी कोरोना योद्धे रुग्णांना रुग्णालयात उपचारासाठी मदत करीत होते. लोकांमध्ये जनजागृतीचे महत्त्वाचे काम करीत होते.

कंदर ता.करमाळा येथील सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, ग्रामसेवक, आशा वर्कर्स, ग्रामपंचायत कर्मचारी, शिक्षक, तलाठी आदींनी कोरोना काळात उत्कृष्ट काम केले. कंदर ग्रामस्थांच्या सहकार्याने कंदरमध्ये कोविड सेंटर उभारले सरपंच, ग्रामसेवक, गावातील सर्व उद्योजक, शेतकरी मदतीसाठी सरसावले. आणि कोरोना काळात कंदरमध्ये कोविड सेंटर उभारून रुग्णांना प्राथमिक वेळेत उपचार मिळाला.

यामध्ये सरपंच भास्करराव भांगे, ग्रामविकास अधिकारी सलीम तांबोळी, रंगनाथ शिंदे, सुहास कदम, नानासाहेब लोकरे, पत्रकार दादासाहेब जगताप आदींचे विशेष सहकार्य होते. त्याबद्दल त्यांचा सन्मान करमाळा विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी विशाल हिरे व सुरेश कोकणे यांच्या हस्ते सर्व आशा वर्कर्स, शिक्षक, ग्रामसेवक, सरपंच यांचा सन्मान करण्यात आला.यावेळी बोलताना करमाळा विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी विशाल हिरे म्हणाले, कोरोना काळात ग्रामस्थांच्या सहकार्याने कंदर ग्रामपंचायतीने कोविड सेंटर उभारून कंदर गाव आदर्श गाव कोविड मुक्त केले. त्यामुळे महाराष्ट्रात या गावाचा आदर्श घ्यावा.”

यावेळी सरपंच भास्करराव भांगे, उपसरपंच मौलासाहेब मुलाणी, माजी आदिनाथ सा.कारखाना व्हा.चेअरमन नानासाहेब लोकरे, करमाळा बाजार समितीचे सदस्य रंगनाथ शिंदे, संतोष माने, भिमराव इंगळे, सोसायटीचे चेअरमन हरिभाऊ गरड, गोपाळ मंगवडे, उद्योजक सुहास कदम, नानासाहेब लोकरे, प्राचार्य वसंतराव नलवडे, करमाळा गटशिक्षणाधिकारी राजाराम भोंग, केंद्र प्रमुख साईनाथ देवकर, लोकल्याण स्कुलचे अध्यक्ष आबासाहेब साळुंखे, ग्रामविकास अधिकारी सलीम तांबोळी, तंटामुक्त अध्यक्ष अरूण यादव आदी उपस्थित होते.

सूत्रसंचालन साईनाथ देवकर व रत्नमाला होरणे यांनी केले.


Share this Newz