The Newz Biz Team, PUNE
तीन आठवड्यापूर्वी आपला ऑन साइट कोव्हिड -१९ लसीकरण उपक्रम सुरू केल्यानंतर आजवर अमेझॉन इंडिया ने पहिल्या फळीचे सहकारी, कर्मचारी आणि त्यांचे कुटुंबीय अशा १ लाख व्यक्तीं चे लसीकरण पूर्ण केले आहे. प्रमुख महानगरे आणि लुधियाना, रांची, रायपूर अशा इतर शहरे मिळून २६ शहरांमध्ये परवानाधारक आरोग्यसेवा संस्थांच्या सहकार्याने हे ऑन साइट लसीकरण होत आहे. येत्या काही आठवड्यांत म्हैसूर, सुरत, इंदूर यांसह इतर शहरांत असे ऑन साइट लसीकरण उपक्रम कंपनी आयोजित करणार आहे.
अमेझॉन ट्रान्सपोर्टेशन सर्व्हिस चे संचालक अभिनव सिंग म्हणाले, आमच्या सर्व टीम चे आरोग्य सुरक्षित ठेवण्याच्या प्रयत्नांचा भाग म्हणून कर्मचारी, व्यावसायिक भागीदार, लघु-मध्यम विक्रेते आणि त्यांचे कुटुंबीय यांना लसीकरण सहज उपलब्ध करून दिले जात आहे. आमचे कर्मचारी, ग्राहक आणि ज्या समाजात आम्ही व्यवसाय करतो त्याची सुरक्षितता याबद्दलची आमची वचनबद्धता यातून अधोरेखित होत आहे. आजवर अमेझॉन इंडियाचे पहिल्या फळीचे सहकारी, कर्मचारी आणि त्यांचे कुटुंबीय अशा १ लाख पेक्षा जास्त व्यक्तींना लस दिली आहे .
मला स्वतःच्या आणि कुटुंबाच्या सुरक्षिततेसाठी लसीकरणाची गरज होती, असे अमेझॉन इंडियाचा पॅकिंग असोसिएट सिकंदर सिंग म्हणाला. आम्ही जिथे काम करतो तिथेच लसीकरण उपलब्ध होणे ही चांगली गोष्ट आहे आणि अमेझॉन ने केलेल्या व्यवस्थेमुळे मला लस मिळाली याचे मला समाधान आहे.
ज्यांना ऑन साइट लसीकरणात सहभागी होणे शक्य नाही अशांसाठी कंपनीने इतर अनेक उपाय योजले आहेत. लसीकरण करून घेणा-या पहिल्या फळीच्या कर्मचा-याना अमेझॉन इंडिया ७५० रुपयांचे विशेष वेतन देत आहे.











Leave a Review