क्रीडाशिक्षक केशव अरगडे यांचा आमदार आण्णा बनसोडे यांच्या हस्ते गौरव

Share this Newz

The Newz Biz Team, PIMPRI

२१ मे ते २३ मे दरम्यान जागतिक बुद्धिबळ संघटनेच्या शैक्षणिक बुद्धिबळ समितीने युरोपमधून घेतलेल्या ऑनलाईन शालेय बुद्धिबळ प्रशिक्षक पदवी परीक्षा, तसेच अखिल भारतीय बुद्धिबळ संघटनेतर्फे घेण्यात आलेल्या ऑनलाईन चेस इन स्कूल ट्रेनर पदवी परीक्षेत यश प्राप्त केल्याबद्दल साधू वासवानी इंटरनॅशनल स्कूलचे क्रीडाशिक्षक केशव अरगडे यांचा पिंपरी विधानसभेचे आमदार आण्णा बनसोडे यांच्या हस्ते गौरव करण्यात आला.

यावेळी आमदार बनसोडे यांनी अरगडे यांना या पदापर्यंत पोहचण्यासाठी काय अडचणी आल्या हे जाणून घेतले. तसेच बुद्धिबळ क्षेत्रात पुढे काय करायचे आहे, आपल्या विधानसभा क्षेत्रात तसेच संपूर्ण शिक्षण क्षेत्रात बुद्धिबळाच्या माध्यमातून काय करता येईल, याबाबतही चर्चा केली. तसेच पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या व मदतीचे आश्वासनही दिले.


Share this Newz