अक्सिस म्युच्युअल फंडातर्फे अक्सिस क्वांट फंड योजना लॉंच

Share this Newz

The Newz Biz Team, PUNE
कॉर्पोरेट प्रशासनावर असलेला भर आणि कॉर्पोरेट डिस्क्लोजरमध्ये  अचानक झालेल्या सुधारणेमुळे गुंतवणूक विश्वास डेटाच्या उपलब्धतेमध्ये  मोठा बदल दिसून येत आहे. या बदलत्या ट्रेंडमुळे मालमत्ता व व्यवस्थापकांना मोठी संधी निर्माण झाली असून त्यामुळे फंडाचे व्यवस्थापन अधिक चांगल्या प्रकारे करता येणार आहे. या नव्या लाटेचा यशस्वी अवलंब करण्यासाठी क्वांटिटेटिव्ह तंत्राचा वापर करता येईल.
अक्सिस म्युच्युअल फंड हा भारतातील सर्वाधिक वेगाने विकसित होत असलेल्या फंड हाउसेसपैकी एक असून कंपनी कायमच गुंतवणुकदारांना त्यांची दीर्घकालीन ध्येय साध्य करण्यात मदत व्हावी म्हणून सुसंगत व नाविन्यपूर्ण उत्पादने पुरवण्यात आघाडीवर राहिली आहे. ही परंपरा कायम राखत अक्सिस म्युच्युअल फंडाने – अक्सिस क्वांट फंड ही नवी फंड योजना जाहीर केली आहे. यात गुंतवणुकीचा मूलभूत बाबींवर आधारित क्वांटिटेटिव्ह दृष्टीकोन अवलंबला जातो.
एनएफओच्या लाँचविषयी अक्सिस एएमसीचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रेश निगम म्हणाले  सक्रिय इक्विटी गुंतवणुकीचे चित्र विकसित झाले आहे आणि मार्केट्सही जास्त कार्यक्षम होत आहेत. मार्केटमधे नवी फंड योजना लाँच करताना कायम गुंतवणुकदारांना त्यांच्या गरजांना योग्य उत्पादन श्रेणी पुरवून आपला पोर्टफोलिओ वैविध्यपूर्ण बनवण्यास मदत केली जाते. यामुळे गुंतवणुकदारांना दीर्घकालीन वाटप शक्य होते.

Share this Newz