आदित्य बिर्ला सन लाइफ इन्शुरन्स तर्फे व्हिजन लाइफइन्कम प्लस योजना सादर

Share this Newz

The Newz Biz Team, PUNE

 

आदित्य बिर्ला सन लाइफ इन्शुरन्स  (एबीएसएलआय) या आदित्य बिर्ला कॅपिटल लिमिटेड च्या (एबीसीएल) आयुर्विमा क्षेत्रातील सहाय्यक कंपनीने निश्चित नियमित उत्पन्न देणारी एबीएसएलआय व्हिजन लाइफइन्कम प्लस योजना  सुरू करीत असल्याची घोषणा केली आहे. ही एक लवचिक स्वरुपाची बचत योजना असून ती नियमित उत्पन्नाखेरीज बोनसची रक्कम लवचिक पद्धतीने देते.

 

ग्राहकांच्या जीवनातील विविध टप्प्यांमध्ये त्यांच्या वेगवेगळ्या आर्थिक गरजांची पूर्तता करण्यात योग्य ठरतील, असे विविध पर्याय उपलब्ध करण्याच्या दृष्टीने ही नॉन-लिंक्ड , पार्टिसिपेटिंग , वैयक्तिक योजना बनविण्यात आली आहे. आयुर्विमा संरक्षणाचे व्यापक फायदे ग्राहकांना देताना, त्यांच्या आयुष्यातील वाढती आर्थिक उद्दिष्टे पूर्ण करण्यासाठी 30 वर्षांपर्यंत नियमित उत्पन्नाची हमी ही बचत योजना मिळवून देते. याव्यतिरिक्तया योजनेत बोनसची रक्कम संपूर्णपणे लवचिक स्वरुपात देण्याचे वैशिष्ट्य समाविष्ट आहे. ही रक्कम संपत्ती निर्माण करण्यासाठी जमा केली जाऊ शकते किंवा तातडीची गरज भागविण्यासाठी ग्राहकांना ती सोयीस्करपणे काढून घेता येते.

 

एबीएसएलआय व्हिजन लाइफइन्कम प्लस  योजनेमुळे ग्राहकांना आयुष्यभर निश्चितपणे अतिरिक्त, करमुक्त उत्पन्न मिळत राहते, तसेच कोणत्याही वेळी हातात रोख रक्कम मिळण्याची तरतूदही यात आहे.

 

या योजनेविषयी माहिती देताना आदित्य बिर्ला सनलाइफ इन्शुरन्स चे व्यवस्थापकीय संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी कमलेश राव म्हणाले, कोविड साथीमुळे निर्माण झालेली अस्थिरता, अर्थव्यवस्था व बाजारपेठेतील चढउतार, यांच्या पार्श्वभूमीवरउद्यासाठी किंवा आजपासून तीन दशकांच्या कालावधीसाठी बचत करून ठेवणे हे सध्या प्रत्येकालाच अत्यावश्यक झाले आहे. आपल्या वैयक्तिक जीवनासाठी वेगवेगळ्या टप्प्यांमध्ये वैयक्तिकृत करता येतील आणि भविष्यातील आर्थिक उद्दिष्टांच्या पूर्ण सुरक्षिततेचे आश्वासन देऊ शकतील, अशा योजनांची आज सर्वांना आवश्यकता आहे. एबीएसएलआय व्हिजन लाइफइन्कम प्लस  योजना ग्राहकांचे उत्पन्न वाढवून व जोखीम कमी करून त्यांची ही तातडीची गरज पूर्ण करेल. या सर्वांगीण उपायातून लोकांच्या अल्प आणि दीर्घ मुदतीच्या आर्थिक गरजा पूर्ण होतील, त्यांना आर्थिक नियोजन व्यवस्थित करता येईल, तसेच संपत्ती वाढविण्यासाठी किंवा आकस्मिक निधी तयार करण्यासाठी यातील बोनसच्या माध्यमातून पैसे मिळू शकतील.

 

ग्राहकांच्या आवश्यकतेनुसार योजना सानुकूलित करण्यासाठी एबीएसएलआय व्हिजन लाइफइन्कम प्लस योजना पुरेशी लवचिकता प्रदान करते व त्यानुसार पुढील लाभ देते :

 

लाभाच्या तीन पर्यायांची निवड : ग्राहकांच्या आयुष्याच्या सर्व टप्प्यांत त्यांच्या गरजा भागविण्यासाठी अल्पकालीन उत्पन्न, दीर्घकालीन उत्पन्न व आयुष्यभराचे उत्पन्न या तीन लाभांच्या पर्यायांतून निवड करण्याची लवचिकता (वयाच्या शंभरीपर्यंत किंवा ८५ वर्षांपर्यंत)

 

अल्पकालीन उत्पन्न : १० वर्षाच्या कालावधीसाठी देय असणारे मासिक हमी उत्पन्न + बोनस. सुरक्षित उत्पन्नासाठी किंवा लवकर सेवानिवृत्तीसाठी नियोजन करणाऱ्या पगारदार, ४५ वर्षांपेक्षा कमी वयाच्या व्यक्तींसाठी हा एक चांगला उपाय असू शकतो.

 

दीर्घकालीन उत्पन्न : २०,२५, ३० वर्षांच्या कालावधीसाठी देय असणारे वार्षिक हमी उत्पन्न + बोनस. विशिष्ट आर्थिक टप्पे गाठण्यात आणि आपत्कालीन निधी तयार करण्यात लोकांना यातून मदत होऊ शकते.

 

आयुष्यभराचे उत्पन्न : वय वर्षे ८५ किंवा वय वर्षे १०० पर्यंत देय असणारे वार्षिक हमी उत्पन्न + बोनस. सेवानिवृत्ती आणि मोठ्या आर्थिक निधीच्या नियोजनासाठी ही एक आदर्श योजना आहे.

 

नियमित उत्पन्नाची हमी : ग्राहकांच्या बचतीच्या रक्षणासाठी त्यांनी निवडलेल्या बेनिफिट पे-आउट  कालावधीत निश्चित उत्पन्नाचा नियमित प्रवाह.

 

बोनसचा लवचिक स्वरुपातील पेआऊट : संपत्तीचा निधी किंवा आपत्कालीन निधी म्हणून जमा होऊ शकणारा, पेड-अप अॅडिशन्स च्या रुपातील जाहीर झालेला बोनस. पैशाच्या तातडीच्या गरजांसाठी म्हणून पॉलिसीच्या पहिल्या वर्षापासून रोख रकमांच्या माध्यमातून हे पेड-अप अॅडिशन्स ग्राहक मिळवू शकतात. पॉलिसीच्या कालावधीत कधीही अर्जित पेड-अप अॅडिशन्सची रक्कम अंशतः / पूर्णपणे काढून घेण्याची अतिरिक्त लवचिकता या योजनेमध्ये उपलब्ध आहे.

 

आयुर्विम्याचे व्यापक संरक्षण : या योजनेत वयाच्या १०० वर्षांपर्यंत आयुर्विम्याचे संरक्षण देण्यात येते. पॉलिसीच्या मुदतीमध्ये कधीही विमा उतरविलेल्या व्यक्तीचा दुर्दैवी मृत्यू झाल्यास, ही योजना नामनिर्देशित व्यक्तीला एकरकमी लाभ देईल. याव्यतिरिक्तअल्प मुदतीच्या उत्पन्नाचा पर्याय निवडल्यासपॉलिसी चालू राहण्याचा अंगभूत लाभ या सानुकूल योजनेत मिळेल. त्यामध्ये विमाधारकाचा दुर्दैवी मृत्यू झाल्यास विम्याचे हप्ते माफ करण्यात येतील आणि त्याद्वारे विमाधारकाच्या अनुपस्थितीत त्याच्या कुटुंबाचे भविष्य सुरक्षित राहील.

 

सानुकूल लाभ : ग्राहकांच्या गरजा भागविण्यासाठी नाममात्र किंमतींमध्ये रायडर्सचे लाभ जोडून या व्यापक योजनेला अति-वैयक्तिकृत करण्याचा पर्याय.


Share this Newz