The Newz Biz Team, PIMPRI
पिंपरी चिंचवड शहरातील वाढती कोरोना बाधित रुग्णाची संख्या आणि त्यांना वेळेवर मिळत नसलेल्या उपचाराची दखल घेऊन माजी नगरसेवक राजेंद्र जगताप व साई लीला हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने नवी सांगवी येथे 30 बेडचे कोविड हॉस्पिटल सुरू करण्यात आले आहे.
राज योग हेरिटेज पहिला मजला ,हॉटेल सुरुची, एम एस काटे चौक, नवी सांगवी या ठिकाणी सर्व सुविधा युक्त साई लीला कोविड हॉस्पिटल सुरू करण्यात आले. या हॉस्पिटलमध्ये अतिदक्षता विभाग तसेच सर्वसाधारण वार्ड 30 बेडचे हॉस्पिटल असून, अतिशय माफक दरात कोरोनाबाधित रुग्णांना उपचार दिले जाणार आहे.
पिंपळे गुरव, नवी सांगवी, जुनी सांगवी परिसरात कोरोना रुग्णाची संख्या वाढत असून, रुग्णांना उपचारासाठी सरकारी रुग्णालयात जागा किंवा ऑक्सिजन बेड नसल्यामुळे रुग्णांचे आणि नातेवाईकांची धावपळ होत आहे. त्यामुळे संबधित रुग्णालयातील डॉक्टरशी चर्चा करून सांगवी परिसरात आपण कोविड हॉस्पिटल चालू. करावे जेणेकरून या परिसरातील रुग्णाच्या नातेवाईकांची धावपळ होणार नाही, असे राजेंद्र जगताप यांनी सांगितले.
या रूग्णालयात डॉ. प्रसाद काशीकर, डॉ प्रशांत देशमुख, डॉ सूरज गाडीवर, डॉ अमृता देशमुख या हॉस्पिटलमध्ये हे डॉक्टर रुग्णांवर उपचार करणार आहेत.







Leave a Review