मुलांचा ऑनलाईन शिक्षणाबरोबरच उपक्रम कृतीवर भर

Share this Newz

The Newz Biz, पांडुरंग भगत

सध्या वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शाळा बंद असल्याने मुले ऑनलाईन शिक्षण घेत आहेत. मुले शाळेत असताना मराठी, इंग्रजी, गणित, विज्ञान या विषयाबरोबरच खेळ, कार्यानुभव या विषयाला महत्त्व देत होते. मुलांना हे विषय आवडतात. त्यामुळे मुले घरबसल्या उपक्रम कृतीवर भर देत आहेत.

कंदर ता.करमाळा येथील मुले घरबसल्या रंगीत कागदापासून विविध प्रकारच्या वस्तू तयार करणे, तुटलेल्या खेळण्यापासुन शोभेच्या वस्तू तयार करणे आदी वस्तू तयार करत आहेत. त्यामुळे मुले ऑनलाईन शिक्षण घेत आपल्या आवडीच्या वस्तू तयार करणे व चित्र काढण्यात मग्न झाले आहेत.

मुलांच्या आवडीचा विषय चित्रकला, यातून मुले घरबसल्या आपल्या परिसराचे निरिक्षण करून विविध प्रकारचे चित्र काढत आहेत.

– राजकुमार राऊत, सचिव बबनरावजी शिंदे स्कूल कंदर

सध्या मुले घरबसल्या मैदानी खेळ खेळू शकत नाहीत. पण कँरम,बुद्धीबळ आदी खेळही खेळत आहेत. मुख्य विषयाबरोबरच मुलांना कार्यानुभव, चित्रकला या विषयात आवड असते. त्यामुळे या विषयातून मुलांच्या सुप्त गुणांना मोठ्या प्रमाणावर वाव मिळत असतो. त्यामुळे पालकांनी घरबसल्या मुलांना त्याच्या आवडीनुसार उपक्रम कृतीवर भर देण्यास प्रोत्साहन दिले पाहिजे.

– प्रा.संदीपान गुटाळ, इंग्रजी शाळा संस्था चालक संघटनेचे सोलापूर जिल्हा अध्यक्ष


Share this Newz