The Newz Biz Team, PUNE
इतरांना हसवणं हे काही सोपं काम नाही! सध्याच्या परिस्थितीत तर प्रेक्षक हसण्याच्या बाबतीत थोडे जास्तच विचार करू लागलेत. अशा आव्हानात्मक काळात प्रेक्षकांमध्ये उत्साह निर्माण करण्यासाठी टाटा स्काय कॉमेडी घेऊन आले आहेत डेलनाझ की पाठशाला . यात डेलनाझ इराणीच्या छोट्या छोटया गमतीजमती असतील. बॉलिवुड आणि छोट्या पडद्यावर अनेक ख्यातनाम भूमिकांसाठी ओळखली जाणारी डेलनाझ ऑनलाइन पद्धतीत आयुष्य कसं सुकर करायचं याच्या काही नव्या पद्धती सांगणार आहे. आता ती व्हर्च्युअल क्लासरूमबद्दल विनोदी भाष्य करणार आहे. टाटा स्काय कॉमेडीवर चॅनेल १३५ क्रमांकावर दर शनिवार आणि रविवारी सायं. ६.३० वाजता प्रसारित होणार आहे.
सध्याच्या जागतिक महासंकटाच्या काळात नव्या शिक्षण पद्धतीला मुलं आणि शिक्षक कशा पद्धतीने हाताळतात हे या छोट्या दृश्यांमध्ये म्हणजेच शॉर्ट्समध्ये गमतीशीर आणि विनोदी पद्धतीने मांडण्यात आले आहे. सध्याचा गंभीर काळ काही प्रमाणात सुसह्य करण्याचा उद्देश या हलक्याफुलक्या विनोदामागे आहे.
या नव्या सीरिजबद्दल डेलनाझ म्हणाली, सध्या प्रत्येकालाच छान हसत राहण्याची गरज आहे आणि डेलनाझ की पाठशालामधून प्रेक्षकांना एरवीच्या गंभीर वातावरणात काही छान चिंतामुक्त क्षण अनुभवता येतील. मी या चित्रिकरणात फारच धमाल केली आणि माझ्यासोबत सगळ्यांनाच हा आनंद अनुभवता येईल, अशी आशा आहे.







Leave a Review