महापौर माई ढोरे यांनी केली जम्बो कोविड सेंटरची पाहणी

Share this Newz

The Newz Biz Team, PUNE

पिंपरी-चिंचवड शहरातील व जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची वाढती आकडेवारी पाहता ऑक्सिजन बेड, व्हेंटिलेटर बेडची मागणी वाढली आहे. त्यामुळे जम्बो कोव्हीड सेंटर लवकरात लवकर चालू करण्यासाठी लागणा-या उपायोजनांची महापौर उषा उर्फ माई ढोरे, पक्षनेते नामदेव ढाके यांनी पाहणी केली.

कोरोना रुग्णांची वाढती संख्या पाहता ऑक्सिजन बेड, व्हेंटिलेटर बेडला मागणी वाढणार आहे. त्यामुळे जम्बो कोविड सेंटर लवकर सुरू करण्यात येणार आहे. त्यासाठीच्या उपाययोजनांची माहिती घेतली असून, कोरोना रूग्णाला चांगल्या उपचाराची व्यवस्था होईल, अशा सूचना सर्व अधिकारी व डॉक्टर वर्गाला देण्यात आल्या आहेत, असे महापौर माई ढोरे यांनी सांगितले.

 


Share this Newz