The Newz Biz Team, PIMPRI
पिंपळे निलख येथील जय मल्हार जेष्ठ नागरिक संघातर्फे कोरोना काळात समाजोपयोगी करी करणार्या विविध क्षेत्रातील व्यक्तींचा कोविड योद्धा पुरस्कार देऊन नुकताच गौरव करण्यात आला.
येथील हनुमान मंदीर सभागृहात झालेल्या कार्यक्रमात सांगवी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक रंगनाथ उंडे, महापलिका दवाखान्यातील वैद्यकीय आधिकारी डॉ. जयश्री शेलार, सामाजिक कार्यकर्ते शिरीष संभाजीराव साठे, पिंपरी चिंचवड महासंघाच्या सचिव वृषाली मरळ, आदींचा यावेळी सन्मान करण्यात आला.
यावेळी जेष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष सुरेश साठे, भास्कर इंगवले, बाबासाहेब इंगवले, रामदास जगदाळे, दामोदर जगताप, बाळासाहेब इंगवले, उत्तम इंगवले, बसवराज हारसुरे, सोपान सदाकाळ, दौलत कामठे, तुकाराम बडगे यांच्यासह संघाचे अन्य सभासद उपस्थित होते.









Leave a Review