मायमनीमंत्रा वाढविणार महाराष्ट्रातील ३ व ४ टियर शहरांत नवीन शाखा 

Share this Newz

The Newz Biz Team, Pune

मायमनीमंत्रा डॉट कॉम या वित्तीय सेवा बाजारपेठेने ३ आणि ४ टियर शहरांत आपले फि-जीटल अस्तित्व विस्तारण्यासाठी सेवेपासून दूर असणाऱ्या भारतीयांसाठी कर्ज उपलब्ध करून दिले. संपूर्ण भारतात १४ राज्यांमध्ये १०० हुन अधिक शाखा असलेल्या मायमनीमंत्रा द्वारे ग्राहकांच्या सुलभतेनुसार ऑफलाईन किंवा ऑनलाईन पद्धतीने कर्जासाठी अर्ज करता येणार आहे. या ३० वर्षे जुन्या ग्राहक वित्तीय बाजारपेठेने ७० लाखांहून अधिक ग्राहकांना सेवा उपलब्ध करून दिली आणि भारतात १०० पेक्षा अधिक बँकिंग सहयोगींसमवेत वित्तीय उत्पादनांची विस्तृत श्रेणी उपलब्ध आहे. या कंपनीद्वारे छोट्या नगरांमधून कर्जे आणि क्रेडीट कार्डकरिता मोठ्या प्रमाणावर मागणी वाढते आहे.

आगामी काळात उपनगर प्रकारात न मोडणाऱ्या क्षेत्रांत वृद्धीचे गणित दुप्पट करण्याच्या हिशेबाने टियर ३ आणि ४ शहरांत मोठ्या वेगाने नवीन शाखांची भर घालण्याची योजना आहे. तसेच ग्राहकांच्या सर्वंकष गरजांची पूर्तता फि-जीटली करण्यात येईल. मायमनीमंत्राची साल-दरसाल वृद्धी ३० टक्के हून अधिक वेगाने वाढत चालली आहे आणि कोविडचा अडथळा निर्माण झाल्यानंतरही वाढीचा वेग कायम राहिला. मायमनीमंत्रा ही भारतातील सर्वात मोठी फि-जीटल (फिजीकल-डिजीटलबाजारपेठ वैयक्तिक कर्जे, गृह कर्जे आणि क्रेडीट कार्ड उपलब्ध करून देते. मागील ५ वर्षांपासून मायमनीमंत्रा द्वारे ३०,००० करोड  कर्जाची निर्मिती झाली आणि याद्वारे वैयक्तिक वित्तसाह्य लक्षावधी भारतीयांना उपलब्ध झाले.

नवीन एमएमएम शाखा लॉन्च करण्याच्या योजनेवर बोलताना मायमनीमंत्रा डॉट कॉमचे संस्थापक आणि व्यवस्थापकीय संचालक राज खोसला म्हणाले, साधारण ३ दशकांहून अधिक काळ आमच्या ग्राहकांना वित्तीय उत्पादने यशस्वीपणे देऊ केली आहेत. आजच्या तारखेपर्यंत आम्ही ७० लाखांहून अधिक ग्राहकांना सेवा दिली आहे.

जॉर्जटाऊन युनिव्हर्सिटी व्हाईट पेपरमध्ये आमच्या नफ्याची शक्ती दिसून येते, फिजीटल वित्तीय सेवा बाजारपेठ हे एक हटके आणि वेगाने वाढणारे बिझनेस मॉडेल आहे. आम्ही यावर्षी १०० वित्तीय सहयोगींसमवेत ६० शहरांमध्ये ५३९७ कोटीं रूपयांचा पतपुरवठा निर्माण केला.


Share this Newz