The Newz Biz Team, Pimpri Chinchwad
दिवाळीचा सण हा सर्वांनाच आनंदाची पर्वणी देणारा असतो. समाजातील श्रमिक, कष्टकरी, कर्मचारी अशा कामगारांचा आनंद द्विगुणित करण्यासाठी निराधार मुले मुली, सफाई कर्मचारी यांना मंथन फाउंडेशनच्या वतीने मिठाई वाटप करण्यात आली.
लक्ष्मीपूजन व बालदिनाचे औचित्य साधून चिंचवड येथील पुनरूत्थान समरसता गुरुकुलम अनाथाश्रमामधील मुलांना दिवाळी फराळ वाटप करण्यात आला. यामध्ये चकली, चिवडा, लाडू, करंजी ,बाकरवडी, अनारसे, शंकरपाळी व मिठाई देण्यात आली. यावेळी आयोजक रोहन चौगुले, जितू ठाकूर, रोनित चौगुले यश गजरे, रोहित मदास, आर्यन वेदपाठक, गौतम साने आदी उपस्थित होते.
याबरोबरच महिला सफाई कर्मचाऱ्यांना मिठाई वाटप करण्यात आली. या वेळी प्रीती चौगुले, रोहन चौगुले, जितू ठाकूर, रोनित चौगुले आर्यन वेदपाठक उपस्थित होते. कार्यक्रमाचे आयोजन मंथन फाउंडेशन तर्फे नितीन चौगुले व प्रीती चौगुले यांनी केले होते.







Leave a Review