The Newz Biz Team, Pune
‘We Maratha Smart Kid 2020’ या स्पर्धेला मिळालेल्या भरोघस यशानंतर We Maratha संघटनेच्या महिला विंगने ‘We Maratha Smart Cake Bake Off 2020’ स्पर्धेचे आयोजन केले होते. या स्पर्धेत उरुळी कांचन येथील पूजा तुपे विजेत्या ठरल्या. या स्पर्धेत 23 महिलांनी सहभाग नोंदवला.

या स्पर्धेला महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. स्पर्धेत महिलांनी विविध प्रकारचे केक बनवून आपले कौशल्य दाखवून दिले. महिला विंगप्रमुख स्नेहल कदम यांच्या संकल्पनेतून ही अभिनव स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. स्पर्धा यशस्वी करण्यासाठी दीपाली कदम, दीपाली प्रशांत, पूजा शिनगार, गायत्री पाटील आदी महिला पदाधिकाऱ्यांनी परिश्रम घेतले.
याबाबत बोलताना संघटनेचे अध्यक्ष अनिरुद्ध शिवाजी शेलार यांनी सांगितले, की संघटना नेहमीच विविध उपक्रमांचे आयोजन करीत असते. यापुढेही नाविन्यपूर्ण उपक्रम राबवले जाणार आहेत. येत्या काही दिवसात मराठा उद्योजकांचा ऑनलाईन मेळावा आयोजित करण्यात येणार आहे. एवढेच नाही तर ‘मराठा उद्योजकांचा ऑनलाइन आठवडी बाजार’ उपक्रम राबविण्यात येणार आहे.
स्पर्धकांचे बॅनर ग्राफिक्स बनवण्यासाठी, तसेच स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळावा, यासाठी संघटनेचे प्रचार/प्रसार प्रमुख दत्तप्रसाद (माऊली) इंगळे, सोशल मीडिया प्रमुख सुधीर सोनवणे यांनी काम पाहिले.











Leave a Review