The Newz Biz Team, Pimpri-Chinchwad
शंभर वर्षांची परंपरा असलेल्या खासगी क्षेत्रातील सीएसबी बँकेने आपल्या विस्तार योजनेचा भाग म्हणून पिंपरी येथे नवीन शाखा सुरू केली आहे (कालिका चेंबर्स, तळमजला, एसआर क्र. २०६, सीटीएस क्र. ४७१६, थायसनक्रूप इंडस्ट्रीजसमोर, पिंपरी). या नव्या शाखेत सर्व प्रकारच्या ठेवी व सोनेतारण कर्ज सुविधा त्वरीत मिळणार आहेत.
२०२० -२१ या आर्थिक वर्षात देशभरात १०० हून अधिक शाखा उघडण्याची योजना सीएसबी बँकेने या वर्षाच्या सुरुवातीस जाहीर केली होती. सोनेतारण कर्ज देण्याचा सीएसबी बँकेचा मूळ व्यवसाय वार्षिक ४७ टक्क्यांनी वाढत आहे. सोनेतारण कर्जांच्या मागणीत होत असलेला स्पष्ट बदल लक्षात घेत, या बँकेने एकूण कर्ज वितरणात सोनेतारण कर्जांचे प्रमाण एक तृतियांश इतके राखले आहे.
विस्तार योजनेबाबत बोलताना सीएसबी बँकेचे व्यवस्थापकीय संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी सी. व्ही. आर. राजेंद्रन म्हणाले, शंभर वर्षांची परंपरा असलेली सीएसबी बँक आपल्या ग्राहकांना व्यक्तिगत सेवा देण्याबद्दल व उत्तम भांडवल राखून असण्याबद्दल नावाजलेली आहे. नव्या शाखा उघडल्याने कासा व सोनेतारण कर्जाच्या व्यवसायाव्यतिरिक्त, एमएसएमई क्षेत्राला व कृषी उद्योगाला वित्तपुरवठा करण्याच्या नव्या संधी आम्हाला मिळू शकतील. केरळ राज्याबाहेर देशात, विशेषतः पश्चिम व दक्षिणेकडील भागांत व्यवसाय वाढविण्याचे आमचे ध्येय आहे.
सध्या १८ राज्ये व २ केंद्रशासित प्रदेशांत या बँकेच्या ४३२ शाखा व ३१० एटीएम कार्यान्वित आहेत. नव्या शाखेमध्ये कृषी, एसएमई, कॉर्पोरेट व एनआरआय बँकिंग अशा सुविधा व सेवा उपलब्ध असणार आहेत.







Leave a Review