हुतात्मा राजगुरू पत्रकार संघाच्या खेड तालुका अध्यक्षपदी हनुमंत देवकर; उपाध्यक्षपदी मिलिंद शिंदे व हमीद शेख

Share this Newz

The Newz Biz Team, Pune

पुणे जिल्हा पत्रकार संघाशी संलग्न असलेल्या हुतात्मा राजगुरू पत्रकार संघाच्या खेड तालुका अध्यक्षपदी हनुमंत देवकर यांची, तर उपाध्यक्षपदी मिलिंद शिंदे व हमीद शेख यांची निवड करण्यात आली.

पत्रकार संघाची द्विवार्षिक निवडणूक प्रक्रिया गुरुवारी पार पडली. १ नोव्हेंबर २०२० ते ३१ ऑक्टोबर २०२२ या दोन वर्षाच्या मुदतीसाठी घेण्यात आलेल्या कार्यकारिणीच्या नऊ जागांसाठी प्रत्येकी एक असे नऊ अर्ज दाखल झाल्यामुळे निवडणूक बिनविरोध झाल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी सूर्यकांत किंद्रे यांनी जाहीर केले. संजय इंगुळकर यांनी सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून काम पाहिले.

नवीन कार्यकारिणी अशी :
अध्यक्ष हनुमंत देवकर, उपाध्यक्ष मिलिंद शिंदे व हमीद शेख, सचिव गणेश आहेरकर, कोषाध्यक्ष संजय बोरकर, जिल्हा प्रतिनिधी अर्जुन मेदनकर; तर कार्यकारिणी सदस्यपदी श्रीकांत बोरावके, अनिराज मेदनकर, सुनील बटवाल, अयाज तांबोळी, दत्ता घुले, प्रभाकर जाधव, निलेश डोके, भीमाशंकर टाकळकर, बापूसाहेब सोनवणे, ॲड. सोमनाथ नवले, प्रसन्नकुमार देवकर, कुमार नवरे, सल्लागारपदी ॲड. विलास काटे, शिवाजी आतकरी, हरिदास कड, संजय बोथरा, कल्पेश भोई, विवेक बच्चे, रवी साकोरे यांची बिनविरोध निवड झाली.

नवीन कार्यकारिणीचे मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त एस. एम. देशमुख, कार्याध्यक्ष शरद पाबळे, विभागीय सचिव बापूसाहेब गोरे, पुणे जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष सुनील लोणकर, जिल्हा समन्वयक सुनील जगताप, परिषद प्रतिनिधी एम. जी. शेलार यांनी अभिनंदन करीत शुभेच्छा दिल्या.


Share this Newz