Flipkart ची Big Billion Days सेलची घोषणा; product घ्या जाणून

Share this Newz

The Newz Biz Team, नवी दिल्ली

फेस्टिव्ह सीजनमध्ये Flipkart ने Big Billion Days सेलची घोषणा केली आहे. 16 ऑक्टोबरपासून हा सेल सुरू होत आहे.  Big Billion Days सेल या बिग बिलियन डेच्या 5 दिवस आधी ग्राहक निवडक product बुक करू शकतात. सेलच्या आधी फ्लिपकार्टने 14 ऑक्टोबरपर्यंत निवडक product निवडण्याचा ऑप्शन दिला आहे. निवडलेले product सेलच्या आधी फक्त एक रुपयात बुक करू शकतात.

Flipkart Big Billion Days Sale ची सुरुवात 16 ऑक्टोबरपासून सुरू होत आहे. प्री-बुकिंग करणारे ग्राहक बिग बिलियन डेज सेलच्या दिवशी बुक केलेल्या product चे उर्वरित पेमेंट करून खरेदी करू शकतात. तसेच, ग्राहकांना पेमेंट करण्यासाठी ऑनलाईन किंवा कॅश ऑन डिलिव्हरीचा ऑप्शन देण्यात आला आहे.

प्री-बुकिंगसाठी सुमारे 10 लाख product उपलब्ध असणार आहेत. यामध्ये होम, लाइफस्टाइल, ब्युटी, बेबीकेअर आणि इलेक्ट्रॉनिक अ‍ॅक्सेसरीजचा समावेश आहे. फ्लिपकार्टच्या बिग बिलियन डेज सेलसोबत अ‍ॅमेझॉनचा ग्रेट इंडिया फेस्टिव्हल आणि स्नॅपडीलचा कुम में डम सेल सुरू आहे.

फ्लिपकार्टच्यावतीने असे सांगण्यात आले होते की, सेलदरम्यान सुमारे 200 special addition product आणले जाणार आहेत. यात 100 पेक्षा जास्त लीडिंग ब्रँड प्रोडक्ट असणार आहेत. सेलदरम्यान या प्रोडक्टच्या खरेदीवर स्टेट बँक ऑफ इंडियाच्या क्रेडिट आणि डेबिट कार्डवर 10 टक्के सूट देण्यात येत आहे. तसेच, बजाज फिन सर्व्हिस आणि इतर लिडिंगच्या बँकांकडून नो कॉस्ट इएमआयचा ऑप्शन उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. फ्लिपकार्टने पेटीएमशी भागीदारी केली आहे. त्यामुळे सेलदरम्यान ग्राहकांना पेटीएम वॉलेट आणि पेटीएम यूपीआयच्या माध्यमातून कॅशबॅक ऑफर दिली जाणार आहे.


Share this Newz