गरवारे पॉलिस्टर लिमिटेडला पुन्हा ‘केअर ए’ रेटिंग

Share this Newz

The Newz Biz Team, पुणे

केअर रेटिंग्ज या भारतातील आघाडीच्या क्रेडिट रेटिंग एजन्सीने गरवारे पॉलिस्टर लिमिटेडला पुन्हा एकदा केअर ए हे रेटिंग दिले आहे आणि आउटलूक स्टेबलवरून पॉझिटिव्ह असा सुधारला आहे.

गरवारे पॉलिस्टर लिमिटेडच्या (जीपीएल) बँक सुविधांना दिलेल्या रेटिंगमध्ये पॉलिमर मूल्यसाखळी उद्योगातील जीपीएलची पाच दशकांची कामगिरी, वैविध्यपूर्ण उत्पादने, जगभर व्यापक भौगोलिक विस्तार व एकात्मिक उत्पादन सुविधा यांचा विचार करण्यात आला आहे.

गेल्या काही वर्षांमध्ये, उच्च क्षमतेच्या सातत्यपूर्ण वापरातून ऑपरेटिंग कामगिरीमध्ये सुधारणा झाल्याचे अधोरिखेत झाले आहे. तसेच, मूल्यवर्धित उत्पादनांवर अधिक भर देण्यात आल्याने ऑपरेटिंग प्रॉफिट मार्जिन वाढले आहे (आर्थिक वर्ष 20 व आर्थिक वर्ष 21 मधील पहिली तिमाही) आणि त्याची दखल रेटिंगने घेतली आहे.

कर्जाची ठरलेल्या मुदतीत परतफेड केल्याने आर्थिक वर्ष 20 मध्ये संबंधित निर्देशांकांमध्ये सातत्याने सुधारणा झाल्याची दखल रेटिंगने घेतली आहे.

रेटिंग वाढल्याबद्दल बोलताना, जीपीएलचे अध्यक्ष एस. बी. गरवारे म्हणाले, रेटिंगमध्ये झालेली सुधारणा हे जीपीएलच्या उत्तम कामगिरीचे प्रतिक आहे. केअर रेटिंग्जने जीपीएलची पॉलिस्टर उद्योगातील स्पर्धात्मक क्षमता आणि काम करण्याचे मापदंड विचारात घेतले आहेत.

दीर्घकालीन बँक सुविधा 369.81 कोटी रुपये (288.97 कोटी रुपयांवरून वाढ) केअर ए / पॉझिटिव्ह. अल्पकालीन बँक सुविधा (198.19 कोटी रुपये) रेटिंग केअर A1.


Share this Newz