लायन्स क्लब डिस्ट्रीक्ट 3234 डी 2 तर्फे आत्मनिर्भर भारत योजनेचा शुभारंभ

Share this Newz

The Newz Biz Team, Pune

डिस्ट्रीक्ट 3234 D2 शैक्षणिक विभागाच्यावतीने विविध विषयातील आत्मनिर्भर भारत संकल्पना प्रोजेक्ट राबविण्यात येणार आहेत. यामध्ये पुणे जिल्हातील प्रत्येक तालुक्यात अवकाश निरीक्षण केंद्र काढणार आहे. यातील जेजुरीनंतर दुसरे केंद्र शिरगाव मावळ येथील शारदाश्रम शाळेत होणार आहे. यासाठी हेन्कल इंडिया कंपनीने सीएसआर फंड दिला आहे. लायन्स क्लब डिस्ट्रीक्ट गव्हर्नर अभय शास्त्री यांच्या हस्ते एक लाख रुपयांचे टेलिस्कोप व इतर साहित्य शारदाश्रम विघालयाचे कापरे व संतोष चव्हाण यांच्याकडे देण्यात आला.

दुस-या उपक्तमात पुण्यातील गांधर्व महाविद्यालयात ग्रामीण भागातील संगीत शिक्षणा-या शिक्षकांसाठी मदत करणार असून, शिक्षण पुर्ण झाल्यानंतर त्यानी गावातच शाळेत शिकवून आत्मनिर्भर व्हायचे आहे. याप्रसंगी गांधर्व महाविलयाचे प्राचार्य प्रमोद मराठे यांनी आर्थिक मदतीचा धनादेश स्वीकारला.

तिस-या उपक्रमात अनेक गरीब मुलींना आर्थीक निधी अभावी राज्य व राष्ट्रीय पातळीवर परफार्म करता येत नाही. यासाठीपुणे येथील महाराष्ट्र मंडळातील तसेच नाशीक नगर येथील मुलींना कीट, शुज तसेस शारिरीक तंदुरीस्तीसाठी साहित्य खुराक देण्यात येणार आहे. याप्रसंगी पल्लवी गुडसे या राष्ट्रीय पातळीवरील खेळाडूला कीट देऊन सन्मानीत करण्यात आले. यावेेळी प्रशिक्षक राजेंद्र कदम उपस्थित होते. चौथ्या उपक्रमात आदिवासी इंजीनिअरिंग मुलांना 5 लॅपटाॅप व पुण्यातील गरीब विद्यार्थ्यांना लॅपटाॅप देण्यात आले. सिध्देश जाधव याने याचा स्वीकार केला. ग्रामीण भागातील मुलांना पॅमटाॅप, ई-लर्निग सुविधा देणार असल्याचे सांगण्यात आले.

पाचव्या उपक्रमात पुणे, अहमदनगर, नाशिक जिल्हातील मुलींसाठी आर्मी नेव्ही भरतीसाठी मोफत मार्गदर्शन व ट्रेनिंग देणार असल्याचे सांगण्यात आले. यातून मुली आत्मनिर्भर होतील. सहाव्या उपक्रमात गरीब कुटुंबातील मुलींचा शैक्षणीक खर्च विविध लायन्स क्लब करणार आहे. याची सुरवात कटारिया हायस्कुल येथील वस्तीत राहणाऱ्या दहा मुलींचा शैक्षणीक खर्चाचा धनादेश वाघ यांना देऊन करण्यात आला. तर सातव्या उपक्रमात वेदातील सायन्स या विषयी अनेक उपक्रम लाॅकडाऊन उठल्यानंतर करण्यात येणार आहेत.

या प्रसंगी लायन्स शैक्षणिक विभाग प्रमुख यांनी ग्लोबल मिशन संस्थेशी सहकार्य करुन जिल्हामध्ये 5 ठिकाणी अशी अवकाश केंद्र काढली जाणार असल्याचि माहीती डाॅ प्रसाद खंङागळे यांनी दिली. यातून भविष्यात संशोधक बनवून आत्मनिर्भर भारत बनविण्यासाठी प्रयत्न आहे.
प्रांतपाल अभय शास्त्री यांनी सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन दिले. ग्रामीण भागातील एका अवकाशदर्शन शाळेच्या खर्चाची घोषणा केली.

लायन्स ग्रामीण शैक्षणिक विभागप्रमुख लायन प्रकाश नारके, लायन विलास काळे, डाॅ. विशाल कुंभारे. गांधर्व महाविलाय प्राचार्य पंडित प्रमोद मराठे, सहकारनगरचे अध्यक्ष ला. प्रताप शिंदे, नंदु जाधव, लायन्स क्लबचे पदाधिकारी उपस्थित होते.


Share this Newz