मेडिमिक्सची आयुर्वेदिक हॅन्ड वॉश आणि हॅन्ड सॅनिटायझर्सची श्रेणी सादर

Share this Newz

The Newz Biz Team, पुणे

आयुर्वेदाच्या त्वचा संरक्षणाचा ५० वर्षांचा अनुभव असलेल्या, मेडिमिक्सने गेल्या काही दिवसांपुर्वीच आपल्या नवीन आयुर्वेदिक हॅन्डवॉश आणि हॅन्ड सॅनिटायजरची नवीन श्रेणी सादर केली आहे.

या हॅन्डवॉशच्या श्रेणीमुळे आपल्याला नैसर्गिक घटकांच्या मदतीने ९९.९% जंतूं प्रती संरक्षण मिळते. कालांतराने मेडिमिक्स हे नाव “नैसर्गिकरित्या त्वचेचे संरक्षण” म्हणून ओळखले जाऊ लागले आहे आणि यात त्यांना नैसर्गिक त्वचा उत्पादने वापरू इच्छीणाऱ्या प्रामाणिक ग्राहकांचा विश्वास देखील जिंकता आला आहे. आयुर्वेदाच्या गुणांनीयुक्त, मेडिमिक्स आता आपल्या उत्पादनांची श्रेणी, बाजारातील वाढत्या मागणीमुळे, हॅन्डवॉश आणि हॅन्ड सॅनिटायझर्सकडे देखील वळविणार आहे.

मेडिमिक्सचे हॅन्डवॉश आणि हॅन्ड सॅनिटायझर्स हे लिंबू, तुळस, कोरफ़ड, कडूलिंबआणि हळदीसारख्या नैसर्गिक घटकांपासून बनविले गेले असून यामुळे ९९.९% जंतूं पासून संरक्षण मिळते, शिवाय ते आपल्या त्वचे करता कोमल असून, उत्तम सुगंध, तजेला आणि स्वच्छता देखील प्रदान करतात.

नवीन मेडिमिक्स आयुर्वेदिक हॅन्डवॉशमध्ये तीन प्रकार आहेत नेचर फ़्रेश (लिंबू, तुळस, कोरफ़डयुक्त), नेचरसॉफ़्ट (कडूलिंब, हळद, कोरफ़डयुक्त) आणि नेचरकेअर (कडूलिंब, तुळस, कोरफ़डयुक्त).त्यांच्या किमती या रू. ८५, १९० मिली करिता, रू.९०, १७५ मिलीच्या दोन रिफ़िल करिता आणि रू. ११०, ७५० मेगा पॅककरिता असणार आहेत.

नवीन मेडिमिक्स आयुर्वेदा हॅन्ड सॅनिटायझरमध्ये देखील दोन प्रकार आहेत: कडूलिंब, तुळस, कोरफ़ड आणि लिंबू, तुळस, कोरफ़डयुक्त. त्यांच्या किमती या रू.५०, १००मिली करिता, रू.१००, २०० मिली करिता, रू.२५०, ५००मिली करिता आणि रू.२५००, ५ लिटरकरता असणार आहेत. जागतिक आरोग्य संघटनेच्या शिफ़ारसींनुसार, यामुळे पाण्याच्या वापरा शिवाय ९९.९ टक्के जंतू आणि बॅक्टेरियाचा नाश केला जाईल आणि वायरसचा प्रादुर्भाव कमी करण्यास मदत मिळेल. नवीन सादर केलेली उत्पादने ही सगळ्या महत्वाच्या दुकानांमधून आणि ई-कॉमर्स माध्यमांद्वारे उपलब्ध असतील.


Share this Newz