The Newz Biz Team, पुणे /कराड
मोहनराव पाडूंरंग थोरात (तात्या) यांचे ६ अॉक्टोंबर रोजी निधन झाले. कराड तालुक्यातील कार्वे हे त्यांचे मूळगाव. परंतु कामधंद्या निमित्त काही वर्षे ते पिंपरी-चिंचवड, पुणे येथील सांगवी येथे वास्तव्यास होते. सांगवी येथील सातारा,सांगली,कोल्हापूर जिल्ह्यातील रहिवाश्यांना एकञ करून त्यांनी १९७५ मध्ये सातारा जिल्हा मिञ मंडळाची स्थापना केली. मंडळाचे ते संस्थापक अध्यक्ष होते. सातारा जिल्हा मिञ मंडळ हे सांगवीतील पहिले सार्वजनिक मंडळ होय.
ते किर्लोस्कर अॉईल इंजिन खडकी येथे नोकरीस होते. तसेच ते फावल्या वेळेत जमीन खरेदी विक्रीचा व्यवसाय करीत.सामान्यांसाठी त्यांचा व्यवसाय हा ‘धंदा’ नसून, ‘सेवा’म्हणून करीत. सांगवी परिसरात अनेकांना त्यांनी वाजवी दरात प्लाॅट मिळवून दिले. नवी सांगवी परिसरातील सर्वाधिक प्लाॅट विक्री त्यांनी केली. सातारा, सांगली, कोल्हापूर जिल्ह्यातील रहिवाश्यांबाबत त्यांना विशेष आदर होता. त्यांचे वाढते प्रस्थ पाहून अनेक राजकीय नेते त्यांना आपल्याकडे खेचण्यासाठी प्रयत्नशील होते. परंतु ते कोणाच्या वळचणीखाली गेले नाहीत. ‘मोडेन पण वाकणार नाही’, हा ‘सातारी बाणा’ त्यांनी कायम ठेवला. १९८०च्या दशकात ‘बुलेट’ वरून फिरणारे सांगवी परिसरातील ते एकमेव व्यक्तिमत्व होते. परिसरात त्यांचा आदरयुक्त दरारा होता. एक धडाडीचा ‘डॅशिंग’ कार्यकर्ता अशी त्यांची ‘इमेज’होती. एक रुबाबदार व्यक्तिमत्व म्हणून त्यांचा नावलौकीक होता. सांगवीतून त्यांनी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेची निवडणूकही लढविली होती. पिंपरी-चिंचवड मध्ये जे यशवंतराव चव्हाण स्मारक साकारले जात आहे, त्या स्मारकाला लागणारी जागा शहरात उपलब्ध होण्यासाठी त्यांनी व त्यांच्या त्या वेळच्या सहकार्यांनी खुप प्रयत्न केले. ते यशवंतराव चव्हाण स्मारक समिती पिंपरी चिंचवडचे सचिव होते. एस कॉंग्रेसचे ते चिटणीस होते. सातारा जिल्हा मिञ मंडळाच्यावतीने त्यांनी सांगवीत अनेक सामाजिक उपक्रम राबविले. शिक्षणासाठी, नोकरीसाठी परजिल्ह्यातून आलेल्यांना अडचणीत ते त्यांना मदत करीत त्यांच्यासाठी धावून जात. अलीकडचे काही वर्षे ते आपल्या कराड जवळील कार्वे या गावीच होते. शेतीत लक्ष देवून तालूक्यातील राजकारणात ते लक्ष देत. कृष्णा सहकारी साखर कारखाना अविनाश मोहिते पॅनलचे ते उमेदवार म्हणून निवडणूक त्यांनी लढविली. प्रगतशील शेतकरी म्हणून ते प्रसिद्ध होते. राजकारण व समाजकारणात त्यांना विशेष रूची होती.
साप्ताहिक ‘क्रांती प्रकाश’चा अंक त्यांना त्यांचे गावी पोस्टाने मिळाल्यानंतर ते क्रांती प्रकाशमध्ये परिसरातील आलेल्या बातमी विषयी, चालु राजकीय घडामोडींबद्दल आवर्जून ते फोन करून ते माहिती घेत, चर्चा करीत. सातारा मिञ मंडळ सांगवीचे कार्याध्यक्ष व सामाजिक कार्यकर्ते प्रकाश पाटील हे त्यांचे भाचे आहेत. या रुबाबदार व्यक्तीमत्वाचे जाणे मनाला चटका लावणारे आहे.
त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली.!!







Leave a Review