The Newz Biz Team, पुणे :
भारतीय जनता पार्टीचे संस्थापक सदस्य पंडित दिनदयाल उपाध्याय यांच्या जयंतीनिमित्त भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्यावतीने नवी सांगवीतील समर्थनगर येथे प्रभाग क्रमांक 31 चे अध्यक्ष मारुती कवडे यांच्या कार्यालयात पंडित दिनदयाल उपाध्याय यांच्या प्रतिमेला पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले.
यावेळी प्रभाग क्रमांक 31 चे अध्यक्ष मारुती कवडे, संजय निराधार योजनेचे सदस्य संजय मराठे, शिवशरण गायकवाड, रघुजी खळकर, अविनाश आवारे, सुनील कोकाटे, पांडुरंग घाडगे, संजय राठोड, आनंद साठे, सत्यनारायण बांगड, सुनील सुकले, नाना वानखेडे, हनुमंत डुंबरे आदी उपस्थित होते.










Leave a Review